बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे गोविंद नामदेव यांचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्यांनी आजवर ‘सौदागर’, ‘आँखे’, ‘सरफरोश’, ‘सत्‍या’, ‘वॉन्टेड’, ‘भूल भुलैया २’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम काम केलं. ‘शोला और शबनम’ चित्रपटामुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. पण या सुप्रसिद्ध अभिनेत्याला त्याच्या करिअरमध्ये बऱ्याच कठीण प्रसंगाचाही सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गोविंद यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – वयाच्या ५६व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने ३३ वर्षाने लहान मुलीशी गुपचूप केलं दुसरं लग्न, कारण…

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “‘शोला और शबनम’ हा माझा पहिला चित्रपट. यामध्ये मी एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. माझं सगळीकडे कौतुक होत असताना मला बऱ्याच चित्रपटासाठी विचारण्यात आलं. ‘शोला और शबनम’च्या चित्रीकरणादरम्यान मी अभिनेते महावीर सिंह यांच्याबरोबर बसलो होतो.”

“त्यांनी मला सांगितलं की, पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेमधील हा माझा ३२वा चित्रपट आहे. मला इतर कोणत्या भूमिका मिळतच नाहीत. त्यांची ही गोष्ट ऐकून मीही प्रभावित झालो. यासगळ्यामध्ये मीही भरडला जाऊ नये म्हणून एक निर्णय घेतला. मला अनेक चित्रपटांसाठी विचारणा झाली त्यास मी नकार देत गेलो.”

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत समीर चौगुले ऑस्ट्रेलियाला रवाना, विमानामधील फोटो शेअर करत म्हणाले…

पुढे ते म्हणाले, “मी जेव्हा २-३ चित्रपटांसाठी नकार दिला तेव्हा माझ्याबाबत अनेक अफवा पसरवल्या गेल्या. मी घमेंडी असल्याचं बोलण्यात आलं. त्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. चित्रपटामध्ये काम मागण्यासाठी मी सेटवर फिरायचो. घर चालवण्यासाठी मी वर्कशॉप घेण्यास सुरुवात केली. इतर बरीच काम केली. आज याच्याकडून तर उद्या दुसऱ्याच व्यक्तीकडून उधारीवर पैसे घेत दिवस काढले.” पण आज बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी गोविंद नामदेव हे एक आहेत.

Story img Loader