नुकताच ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. मूळ तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, सैफ अली खान मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे दिसत आहे. नुकतंच ता चित्रपटातील ‘अल्कोहोलिया’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आपल्याला हृतिक रोशन थिरकताना दिसत आहे. गाण्याचे लाँचिंग मुंबईतील आयकॉनिक सिंगल-स्क्रीन थिएटर कॉम्प्लेक्स, गेटी-गॅलेक्सी येथे झाले. हृतिक रोशन स्वतः या कार्यक्रमात उपस्थित होता. त्याच्या उपस्थितीने लोकांमध्ये उत्साह वाढला होता.

या कार्यक्रमा दरम्यान २२ वर्षांपूर्वी ‘कहो ना प्यार है’ प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी मी पहिल्या दिवसाच्या पहिल्या शोसाठी इथे आलो होतो. जेव्हा चित्रपट संपला आणि दिवे चालू झाले तेव्हा प्रेक्षकांनी मला ओळखले. त्यादिवशी मी स्वतः प्रेक्षकांचं प्रेम अनुभवले होते. हृतिक रोशन पुढे म्हणाला, “मला अजून आठवतंय कहो ना प्यार है प्रदर्शित होण्यापूर्वी डॉक्टरांनी मला सांगितले होते की माझी तब्येत तितकीशी चांगली नाही आणि त्यामुळे मी चित्रपटांमध्ये अॅक्शन आणि डान्स करू शकणार नाही. मी ते आव्हान म्हणून स्वीकारले. मी माझ्या आरोग्याची आणि फिटनेसची काळजी घेतली. माझ्या २५व्या चित्रपटात मी अजूनही अॅक्शन करत आहे आणि मी अजूनही डान्स करत आहे, हे काही चमत्कारापेक्षा कमी नाही. आणि मी अजूनही माझे संवाद बोलू शकतो”.

“शाहरुख खान बरोबर माझी तुलना करणे… ” दाक्षिणात्य अभिनेता दुलकर सलमानने दिली प्रतिक्रिया

मुळ चित्रपटात माधवन आणि विजय सेतुपती यांच्यातली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली तर या रिमेकमध्ये बॉलिवूडच्या या २ अभिनेत्यांचा अभिनय आपल्याला बघायला मिळणार आहे. मध्यंतरी हृतिकने आमिरच्या चित्रपटाचे कौतुक केल्याने ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ ट्रेंड चांगलाच व्हायरल झाला होता. मुळ चित्रपट लोकांनी भरपूर पसंत केला होता. या रिमेकच्या बाबतीतही बरीच लोकं उत्सुक दिसत आहेत.

गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या या सगळ्यांच्या वतीने विक्रम वेधा हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader