आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर एकीकडे बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरू आहे तर एकीकडे ब्रह्मास्त्र पाहायला लोकांची गर्दीदेखील दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच याविषयी नकारात्मक गोष्टी सोशल मीडियावर पसरवल्या जात होत्या. चित्रपटाचं बुकिंग आधीच जोरदार झालं होतं. नुकतंच या चित्रपटाने ७५ कोटी कमावल्याची बातमी समोर येत आहे.

प्रेक्षक, समीक्षक यांच्या या चित्रपटाच्या बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तसेच चित्रपटसृष्टीतल्या लोकांनीदेखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. नुकतंच हृतिक रोशनने या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. शुक्रवारी हृतिकने हा चित्रपट पाहिला आणि चित्रपट पाहून त्याने संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : बॉयकॉट ट्रेंडमुळे ‘ब्रह्मास्त्र’ हिट की फ्लॉप? जाणून घ्या व्हायरल ट्रेंडमागची ‘ही’ कारणं

हृतिक म्हणतो, “माझ्यात दडलेल्या विद्यार्थ्याला ब्रह्मास्त्रसारखा चित्रपट पुन्हा बघायची इच्छा आहे. चित्रपटातील अॅक्शन, स्पेशल इफेक्ट, पार्श्वसंगीत सगळंच अप्रतिम आहे. मी या चित्रपटाचा मनसोक्त आनंद लुटला आहे. संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा.” हृतिकने ट्वीट करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे.”

आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’च्या वेळेसही हृतिकने अशीच प्रतिक्रीया दिली होती. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ हा ट्रेंड व्हायरल झाला होता. आता पुन्हा ‘ब्रह्मास्त्र’चं कौतुक केल्यामुळे लोकांनी पुन्हा त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा बॉयकॉट ट्रेंड चर्चेत येऊ शकतो. हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ येत्या ३० सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader