सध्या बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार घातला जात आहे. प्रेक्षक वर्गाच्या मोठ्या संख्येने हिंदी चित्रपटांकडे पाठ फिरवली असल्याने बड्या स्टार्सचे चित्रपटही चांगली कमाई करू शकत नाहीयेत. काही कलाकार प्रेक्षकांच्या विरोधात बोलत आहेत. तर काही प्रेक्षकच परमेश्वर असतात म्हणत त्यांच्या कलाने घेत आहेत. अशातच अभिनेता हृतिक रोशननेही अशी एक कृती केली, जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडेच तो एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमादरम्यान यादरम्यान त्याने तेथे उपस्थित एका चाहत्याच्या पायाला स्पर्श करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्याआधीच अभिनेता प्रतीक बब्बर पुन्हा पडला प्रेमात, करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

हृतिकने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यादरम्यान एका चाहत्याने स्टेजवर येऊन हृतिकच्या पायांना स्पर्श केला. त्यावर क्षणाचाही विलंब न करता हृतिक रोशनही चाहत्याच्या पाया पडला. हृतिक रोशनच्या या कृतीवर नेटकरी प्रचंड प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हृतिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे. ऋतिकची ही अनोखी स्टाइल काही नेटकऱ्यांना आवडतेय. तर काही जण “हृतिकलाही बॉयकॉटची भीती असल्याने तो असा वागला,” असे म्हणत त्याला ट्रोल करत आहेत.

बऱ्याच महिन्यांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेला हृतिक रोशन लवकरच ‘विक्रम वेध’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत अभिनेता सैफ अली खानही झकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ‘विक्रम वेधा’ बॉयकॉटच्या चक्रात अडकू नये यासाठी ऋतिकने फॅनला नमस्कार केला असे नेटकरी म्हणत आहेत.

हेही वाचा : अ‍ॅक्शन अन् अभिनयाचा तडका, हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’चा टीझर प्रदर्शित

दरम्यान, हृतिक रोशन पत्नी सुझान खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री गायिका सबा आझादला डेट करत आहे. अनेकदा हृतिक आणि सबा एकत्र फिरताना दिसले होते. ऋतिकचे हे वैयक्तिक आयुष्यही सोशल मीडियावर नेहमी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor hritik roshan has fear of boycott touched his fans feet rnv