आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. colon infection मुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. कॅन्सर सारख्या आजारावर मात करुन इरफान खानने अंग्रेजी मीडियम या सिनेमाचं शुटींग पूर्ण केलं होतं. काही दिवसांपूर्वीच हा सिनेमा हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला होता.

आईविना मुलीचा सांभाळ करणाऱ्या एका मध्यमवर्गीय बापाची भूमिका इरफानने या सिनेमात केली आहे. या चित्रपटात आपली मुलगी कॉलेजमध्ये चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर कार्यक्रमात भाषण करतानाचा एक डायलॉग ट्विट करत इरफानने आपल्या सर्व चाहत्यांना हा सिनेमा पाहण्याची विनंती केली होती.

Inside I am very emotional outside I am very Happy हे इरफानचं शेवटचं ट्विट ठरलं.

‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

Story img Loader