आपल्या खास स्टाईलने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ. जॅकी श्रॉफला भिडू असंही म्हटलं जातं ते त्याच्या खास पद्धतीने भिडू असं म्हणण्याच्या स्टाईलमुळे. त्याचं इंस्टाग्राम अकाऊंटही अपनाभिडू नावानेच आहे. जॅकीला स्वयंपाक करण्याचीही आवड आहे. त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात जॅकीने सगळे पदार्थ तयार केले आहेत आणि त्यांची नावं तो सांगतो आहे.
युजरच्या कमेंटला जॅकीचं उत्तर
जॅकीने जो व्हिडीओ शेअर केला आहे त्यात दोन प्रकारच्या भाज्या आणि फोडणी दिलेलं वरण दिसतं आहे. शेतातून थेट ताटामधल्या टेबलवर असं म्हणत जॅकीने पाककृती हवी असेल तर सांगा भिडू असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याच व्हिडीओवर एका युजरने त्यावर कमेंट केली आहे. डाळीत माशी फक्त मलाच दिसते का? असा प्रश्न या युजरने केला. त्याला जॅकी उत्तर देत म्हणाला ‘भिडू मी जंगलात बसलोय.’ जॅकीचं हे उत्तर आणि त्याचा हा व्हिडीओही चर्चेत आहे.
दुसरीकडे जॅकीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर सुनील शेट्टीने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. तसंच एक हजारांहून अधिक युजर्सनी यावर कमेंट केल्या आहेत. या व्हिडीओत जे वरण तयार करण्यात आलं आहे त्यात माशी पडलेली दिसते आहे. मात्र मी जंगलात बसलोय असं म्हणत जॅकीने वेळ मारुन नेली आहे. तसंच जॅकीला अनेक युजर्स तुम्ही तुमचा रेसिपी शो सुरु कार भिडू का जादू, जॅकी का जलवा या नावाने शो आला तर नक्की पाहू असंही युजर्सनी म्हटलं आहे.