बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते जॅकी दादा अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफ कायमच आपल्या चाहत्यांचं मन जिंकत आलेले आहेत. त्याने आपल्या डॅशिंग लूक्सने आणि भन्नाट अंदाजाने आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केलेला आहे. नुकतंच जॅकी श्रॉफ यांनी इंडियाज गॉट टॅलेंटच्या मंचावर हजेरी लावली. यावेळी जॅकी श्रॉफ यांनी ‘देवदास’ चित्रपटात ‘चुन्नी बाबू’ या पात्राप्रमाणे वेशभूषा केली होती. याच चित्रपटातील ‘छलक छलक’ या गाण्यावर डान्स करत त्यांनी मंचावर एंट्री केली.
‘इंडियाज गॉट टॅलेंट’चा एक प्रोमो व्हिडीओ सोनी टिव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओ जॅकी श्रॉफ हे नाचत नाचत मंचावर येताना दिसत आहे. यावेळी जॅकी श्रॉफ यांनी काळ्या रंगाचा लांब कोट आणि धोतर परिधान केली होती. ‘छलक छलक’ या गाण्यावर डान्स करतच ते या कार्यक्रमाच्या परिक्षकांची भेट घेतात.
यानंतर जॅकी श्रॉफ हे परिक्षकांच्या खुर्चीवर बसतात. तेव्हा शिल्पा शेट्टी म्हणते की, ‘ते ज्याप्रकारे उड्या मारत मारत नाचत होते. ते पाहून मला वाटत होती. त्यांचे धोतर आता सुटेल की काय?’ शिल्पा शेट्टीचे हे बोलणं ऐकून जॅकी श्रॉफ जोरजोरात हसू लागतात. त्यावर उत्तर देताना ते तिला म्हणतात की, ‘खरंच धोतर सुटणार होतं. पायात अडकलं होते आणि मी ते पकडून ठेवले होते’.
तब्बल ४ वर्षांनी सोनाली बेंद्रे करणार छोट्या पडद्यावर कमबॅक, फोटो पोस्ट करत म्हणाली…
त्याचे हे बोलणं ऐकून किरण खेर म्हणतात की, ‘हे सर्व खोटं आहे. आजकाल सर्वचजण रेडीमेड धोतर परिधान करतात’. यानंतर जॅकी श्रॉफ उभे राहून किरण खेर यांना धोतर दाखवत हे नेसलेलं असल्याचे दाखवतात. यानंतर शिल्पा शेट्टी म्हणते की, जॅकी श्रॉफ यांनी पायात पैंजण घातल्याचे सांगते आणि त्यानंतर जॅकी श्रॉफ हे मंचावर येऊन पायातील पैंजण घातल्याचे दाखवले. दरम्यान याबाबतचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.