करोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडानची घोषणा करण्यात आली होती. पण आता हळूहळू अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लॉकडाउनमुळे मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरणही थांबवण्यात आले होते. त्यामुळे कलाकारांना देखील आर्थिक फटका बसला. अशातच एका अभिनेत्यावर भाजी विकण्याची वेळ आली असल्याचे दिसत आहे.

चांदनी बार, गुलाम या चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता जावेद हैदरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो भाजी विकत असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री डॉली ब्रिंदाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘हा अभिनेता आहे. तो भाजी विकत आहे. त्याचे नाव जावेद हैदर आहे’ असे म्हटले आहे.

तसेच लॉकडाउनमुळे जावेदकडे काम नसल्याचे डॉली बिद्रांने पुढे म्हटले आहे. जावेदने घेतलेल्या निर्णयामुळे त्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. नेटकऱ्यांनी कोणतेही काम छोटे नसते असे म्हणत जावेदचे कौतुक केले आहे.

जावेदने छोट्या पडद्यावरील जिनी और जुजू या मालिकेत देखील काम केले आहे. त्याने बालकलाकार म्हणून चित्रपटात देखील काम केले असल्याचे म्हटले जाते.

Story img Loader