मालिका, नाटक, चित्रपटासह वेब सीरिज अशा सर्वच क्षेत्रात काम केलेला अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीला ओळखले जाते. त्याने मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही त्याचे अढळ स्थान निर्माण केले आहे. यामुळेच त्याचा फार मोठा चाहतावर्ग आहे. जितेंद्र जोशी हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. नुकतंच त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नीच्या फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जितेंद्र जोशीच्या पत्नीचे नाव मिताली जोशी असे आहे. ती चित्रपट आणि नाटकांचे लेखन करतात. त्यासोबतच काही नाटकांचे दिग्दर्शनही तिने केले आहे. तिने काल तिचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने जितेंद्र जोशीने एक पोस्ट शेअर केली आहे.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Swara bhaskar photo with Sajjad Nomani Troll
Swara Bhaskar: ‘व्होट जिहाद’चा उल्लेख केलेल्या सज्जाद नोमानींसह स्वरा भास्करचा फोटो पाहून नेटिझन्सनी उडवली खिल्ली
aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”

“एक सुतार पक्षी असतो. तो फक्त चोच घेऊन सावकाशपणे भल्या मोठ्या झाडाला खिंडार पाडू शकतो कारण त्याच्या इवल्याशा चोची सोबत सातत्य, सराव आणि प्रयत्न ही तीन आयुधं त्याच्या सोबत असतात. आमच्या सुतार पक्ष्याला तर कविता सुद्धा समजते आणि करता देखील येते. आमचा सुतारपक्षी कलाकार आहे , रसिक आहे , बडबड्या आहे, उपद्व्यापी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजन्म विद्यार्थी आहे.” असे त्याने म्हटले.

“एक दिवस तो खिंडार पाडेल आणि ते नक्षीदारच असेल यात मला शंका नाही म्हणूनच मी त्या दिवसाची वाट पाहतोय. ता. क. आज आमच्या सुतारपक्ष्याचा वाढदिवस असतो. “चोच सलामत तो खिंडार पचास” वाढदिवसाच्या शुभेच्छा मिताली,” अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे. त्यासोबत त्याने हटके फोटोही पोस्ट केला आहे.

करीना कपूरला करोना झाल्यानंतर करण जोहरचं ‘त्या’ पार्टीवर स्पष्टीकरण; म्हणाला “माझं घर हॉटस्पॉट…”

सध्या त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. जितेंद्र जोशीच्या या पोस्टवर अभिनेता स्वप्निल जोशी, अभिजीत खांडकेकर, अमृता सुभाष, मंजिरी ओक, यासारख्या अनेक कलाकारांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहे. तसेच या पोस्टवर जितेंद्र जोशीचे अनेक चाहतेही कमेंट करताना दिसत आहेत.