हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांना मंगळवारी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना खाण्यातून विषबाधा झाल्याच्या शक्यतेमुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कमल हसन यांच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नसल्याचे त्यांच्या प्रसिद्धी सूत्रांकडून ट्विटरवर सांगण्यात आले असून,  उपचारांनंतर त्यांना लवकरच रूग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचेदेखील म्हटले आहे. कमल हसन सध्या ‘दृष्यम’ चित्रपटाचा तामिळ रिमेक असणाऱ्या ‘पापनाशम’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.   

Story img Loader