ऑस्कर-विजेता अभिनेता केविन स्पेसी याला लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे. हे यूकेच्या सर्वात हाय प्रोफाइल मीटू प्रकरणापैकी एक होते. साउथवार्क क्राउन कोर्टात चार आठवड्यांच्या खटल्यानंतर अंतिम सुनावणीत ज्युरीने त्याला चार पुरुषांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातून मुक्त केले. कोर्टाचा निकाल ऐकल्यानंतर ६४ वर्षीय केविनला रडू कोसळलं.

“करीनाने चाहत्यांना उत्तरही दिलं नाही”, नारायण मूर्तींनी अभिनेत्रीबद्दल केलेल्या वक्तव्याला सुझान खानचं समर्थन, म्हणाली…

खटला सुरू असताना केविनने त्याच्यावरील आरोप फेटाळले होते. हे आरोप खोटे असल्याचं त्याचं म्हणणं होतं. पैशांसाठी पीडितांना असे आरोप करण्यास प्रवृत्त केल्याचा दावा केविनने कोर्टात केला होता. २००० साली त्याने वेस्ट एंड थिएटरमध्ये एका पुरुषाबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप होता. तोही त्याने फेटाळला होता.

“कोकण खरंच स्वर्ग आहे, कारण…”, मराठी अभिनेत्रीने शेअर केला खड्ड्यांचा व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “सामाजिक प्रश्नावर…”

तक्रारदाराने कोर्टासमोर केविन स्पेसीवर गंभीर आरोप केले होते. त्याने पीडितांचे शोषण करण्यासाठी करण्यासाठी आपली प्रसिद्धी आणि शक्ती वापरल्याचा दावा केला होता. पण अंतिम निर्णय सुनावताना ज्युरीने हे दावे फेटाळले. केविन स्पेसीवर लैंगिक अत्याचारासह एकूण १३ आरोप करण्यात आले होते. न्यायाधीशांनी कायदेशीर तांत्रिकतेचा हवाला देत गेल्या आठवड्यात यापैकी चार आरोप वगळले होते. शेवटी स्पेसीला नऊ वर्षांच्या कालावधीत चार पुरुषांविरुद्धच्या सर्व नऊ लैंगिक गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले.

विशेष म्हणजे, या खटल्यात असं दिसून आलं की तक्रारदारांपैकी दोघे दिवाणी न्यायालयात स्पेसीचा पाठपुरावा करत होते, त्यामुळे त्यांच्या आरोपांमागील हेतूंबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, स्पेसीला त्याच्या वाढदिवशी निर्दोष मुक्त करण्यात आलं. अंतिम निर्णय सुनावल्यावर तो कोर्टातच रडू लागला.

Story img Loader