दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप हिंदी भाषेवरून झालेल्या वादामुळे चर्चेत आला होता. हिंदी भाषेबाबत त्यानं केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेता अजय देवगणनं त्याला ट्विटरवरून उत्तर दिलं होतं. आता किच्चा सुदीप त्याचा आगामी चित्रपट ‘विक्रांत रोना’मुळे चर्चेत आला आहे. किच्चा सुदीपचा हा चित्रपट त्याच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण चित्रपट असणार आहे. किच्चा सुदीपने पुन्हा एकदा बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांबाबत भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – VIDEO : “अनेकांच्या अनेक शंका होत्या पण…” अमोल कोल्हेंच्या ‘या’ पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष

‘विक्रांत रोना’ हा किच्चा सुदीपचा चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा हीच महत्त्वपूर्ण असते असं किच्चाचं म्हणणं आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये किच्चा सुदीपला काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी ‘केजीएफ’ सारखा चित्रपट हिंदीमध्येही सुपरहिट ठरला याबाबत त्याला विचारण्यात आलं. यावेळी तो म्हणाला, “जेव्हा तुमच्या चित्रपटाची कथा बोलू लागते तेव्हा चित्रपट प्रत्येक ठिकाणी पोचतो. हे उत्तम कथा असलेल्या चित्रपटांच्याबाबतीत आपोआपच घडतं. चित्रपटाच्या आशयाला मिळालेलं हे यश आहे.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “प्रेक्षक ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मैंने प्यार किया’, ‘शोले’, ‘हम साथ साथ है’, ‘कभी खुशी कभी गम’ सारखे चित्रपट आजवर पाहत आले आहेत. बंगळुरच्या चित्रपटगृहांमध्येही गुजराथी तसेच पंजाबी कुटुंबियांची कथा आपण पाहिली. त्यामुळे चित्रपटांच्या बाबतीत सांस्कृतिक फरक आहे असा प्रश्नच निर्माण होत नाही.”

आणखी वाचा – प्राजक्ता माळीने स्वतःवरील Viral Memes केले शेअर, अभिनेत्रीला हसू अनावर, म्हणाली…

किच्चा सुदीपचा ‘विक्रांत रोना’ चित्रपट 3D मध्ये भारतातील तब्बल ६ भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. मूळ कन्नड भाषेतील हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शक अनुप भंडारी यांनी केलं आहे. या चित्रपटात किच्चा सुदीप व्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिस, निरूप भंडारी आणि नीता अशोक यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट २८ जुलै २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kichcha sudeepa talk about south film superhit at bollywood box office says content is a king see details kmd