‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे किरण माने प्रसिद्धीझोतात आले. किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची बरीच माहिती आणि अनुभव ते इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. किरण मानेंनी नुकत्याच केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : “पापाराझींना नीसा कशी सांभाळून घेते?” लेकीविषयी सांगताना काजोल म्हणाली, “तिच्याजागी मी असते तर एवढ्यात चप्पल…”

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
Savita Malpekar On Kiran Mane
“चॅनेलने किरणला ४ वेळा वॉर्निंग दिली, मग काढलं” मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं? सविता मालपेकरांनी स्पष्टच सांगितलं…
Kushal Badrike
“कवीने संसारात अडकू नये…”, कुशल बद्रिकेने शेअर केला पत्नीबरोबरचा व्हिडीओ; श्रेया बुगडे कमेंट करीत म्हणाली…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”

किरण माने यांना बरोबर एक वर्षापूर्वी ‘बिग बॉस मराठी’ शोची ऑफर देण्यात आली होती. बिग बॉससाठी होकार दिल्यावर अभिनेत्याचे आयुष्य कसे बदलले, त्यांच्या जीवनात कसा बदल झाला याबद्दल त्यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. किरण मानेंनी बिग बॉस मराठी शो आणि त्यांच्या सगळ्या चाहत्यांना पोस्ट शेअर करत धन्यवाद म्हटले आहे.

हेही वाचा : Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार पोहोचले प्रियदर्शनी इंदलकरच्या गावी, “रानात फेरफटका, डाळिंबाचं शेत अन्…”

किरण मानेंची पोस्ट

हे वर्ष किती झर्रर्रर्रकन निघून गेलं…३ जुलैला, बरोब्बर एक वर्षांपूर्वी सकाळी फोन वाजला. “हॅलो किरणसर, मी एन्डेमॉलशाईन मधून बोलतेय. बिगबॉस सिझन चार साठी आम्ही तुमचा विचार करतोय. होकार असेल तर आम्ही उद्या मिटींगसाठी तुम्हाला भेटायला येऊ का?”

एक निर्णय. हो म्हणू की नाही? वादळ उठलं मनामेंदूत. बिगबॉसचं घर लै रिस्की. लै अफवा. कोण म्हणायचं, ‘ती शापीत ट्रॉफी घेणार्‍या प्रत्येकाचं करीयर संपलेलं आहे.’… कोण सल्ला द्यायचं, ‘तिथं ठरवून एखाद्याला बदनाम करतात.’… कोण भिती घालायचं, ‘आधीच काही लोक टपून बसलेत तुझ्या वाईटावर. त्या माकडांच्या हातात कोलीत देऊ नकोस.’ लै विचार करून म्हन्लं, च्यायला हे चॅलेंज तर घेतलंच पायजे. हे सगळं खोटं ठरवायचा दम हाय आपल्यात. माझ्या चाहत्यांची ताकद जास्त हाय का हितशत्रूंची ते बी जगाला दाखवूया. उतरूया मैदानात. जे हुईल ते हुईल.

…भावांनो आणि बहिणींनो, या निर्णयानं माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं. आधी सर्वांना वाटलं हा लेचापेचाय. दोन आठवड्यात उडवू. पण भलेभले, स्वत:ला धुरंधर समजणारे ‘गामा’, पालापाचोळ्यासारखे उडवून लावत मी ‘टॉप थ्री’पर्यन्त पोहोचलो. त्या अद्भूत घरातनं बाहेर येताच पब्लीकनं जल्लोषात मला डोक्यावर घेतलं. सातार्‍यात मिरवणूकीनं जंगी स्वागत झालं. महाराष्ट्रभर सत्कार झाले. अनेक पुरस्कार मिळाले. आजवर बिगबॉस फक्त शहरी विभागात पाहिलं जायचं. माझ्यासाठी आमचा अख्खा ग्रामीण भाग बिगबॉस पाहू लागला. माझ्या मातीत ‘आपला माणूस’ अशी ओळख झाली. थेट महेश मांजरेकरानी सिनेमात घेतलं. ‘गोलमाल’, ‘सिंघम’ फेम बॉलीवूडमधले प्रसिद्ध आर्ट डिरेक्टर नरेंद्र राहुरीकर यांच्या पहिल्या मराठी सिनेमात महत्त्वाची भुमिका केली. एका मोठ्या-भव्यदिव्य आगामी सिरीयलचं शुटिंग सुरू झालं. हे संपलं की एक जबरदस्त नाटक वाट पहातंय. तिन्ही माध्यमांत बिझी झालो. माझ्या बाबतीतल्या आणि बिगबॉसच्या बाबतीतल्याही सगळ्या अफवा खोट्या ठरल्या.

आजवर मला कुणी गॉडफादर नव्हता. माझ्या डोक्यावर कुणा बड्या दिग्दर्शकाचा, निर्मात्याचा, चॅनलचा हात नव्हता. एकट्याच्या बळावर लढत इथवर आलोय. पण आता म्हणेन, माझा गॉडफादर कुणी असला तर एकच – ‘बिगबॉस’ ! लोकप्रियतेच्या आणि अभिनयक्षेत्राच्या खूप वरच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी जर कुणी मदत केली असेल तर ती फक्त या शो नं… लब्यू बिगबॉस

-किरण माने.

बिग बॉस मराठी शोसाठी किरण मानेंनी शेअर केली खास पोस्ट

दरम्यान, किरण माने लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अभिनेते ‘सिंधुताई…माझी माई’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार असून यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचा जीवनपट दाखवण्यात येणार आहे. ही मालिका कलर्स मराठीवर १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.