स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते किरण माने हे नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. ते नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलयाचे पाहायला मिळते. ते फेसबूकवर पोस्ट करून विविध विषयांवर भाष्य करत असतात. किरण माने यांचे सोशल मीडियावर बरेच फॉलोअर्स आहेत. त्यांच्या फेसबूक पोस्ट चांगल्याचं चर्चेत असतात.
करण जोहरला आवडायची ‘ही’ आघाडीची अभिनेत्री; म्हणाला, “तिच्याशी लग्न करायला…”
दुबई येथे झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला आणि स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरलं. श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला. त्यांच्याकडून सलामीवीर मोहम्मद रिझवान (४९ चेंडूंत ५५) आणि इफ्तिकार अहमद (३१ चेंडूंत ३२) यांनी संयमाने फलंदाजी केली. मात्र, मोक्याच्या क्षणी ते बाद झाल्यावर इतरांना फारसे योगदान देता आले नाही आणि श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली. श्रीलंका जिंकल्यावर त्यांना जगभरातून क्रिकेटपटू आणि क्रीडाप्रेमी शुभेच्छा देत आहेत.
चाहत्यांच्या गर्दीत अडकलेल्या रणवीरला थापड नेमकी कुणी मारली? रेड कार्पेटवरचा Video Viral
अशातच हातात श्रीलंकेचा ध्वज घेऊन मैदानात फिरत असलेल्या भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत किरण मानेंनी टाकलेल्या कॅप्शनची जोरदार चर्चा आहे. “गौतम गंभीरनं श्रीलंकेचा झेंडा नाचवला बिचवला सगळं ठीक हाय… पन त्याच्यामागं त्यो माझा डुप्लीकेट कोन उभा हाय????” असं किरण मानेंनी फोटो शेअर करत लिहिलंय. यावर अनेक फेसबुक युजर्सनी ‘ते तुम्हीच दिसताय’, अशा कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत किरण माने यांनी साजिरीच्या वडिलांची म्हणजेच विलास पाटील ही भूमिका साकारली होती. मात्र त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता या मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. यानंतर बराच गदारोळ झाला होता.