कलाविश्वातील काही मंडळी समाजात घडणाऱ्या एखाद्या घटनेबाबत खुलेपणाने आपलं मत मांडताना दिसतात. त्यातीलच एक व्यक्ती म्हणजे अभिनेते किरण माने. किरण हे बऱ्याच विषयांवर सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतात. महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. याबाबत देखील किरण यांनी पोस्ट शेअर केली होती. पण आता वेगळ्याच कारणामुळे ते चर्चेत आले आहेत. “तुम्ही आपल्या पेजवर जातीयवादी पोस्ट करू नका” असा सल्ला किरण यांना एका व्यक्तीने दिला. याचबाबत त्यांनी भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – Boyz 3 Teaser : पुन्हा एकदा तुफान राडा, ‘बॉईज ३’चा धमाकेदार टीझर पाहिलात का?
वादग्रस्त विषय असो वा एखादी घडामोड किरण माने नेहमी स्पष्टच बोलताना दिसतात. आता थेट जातीयवादी पोस्ट करु नका असा मॅसेज एका पेजच्या अॅडमीनने त्यांना केला. याचबाबत ते पोस्ट शेअर करताना म्हणाले, “… च्यायला मी कधी जातीयवादी पोस्ट केली? आणि का करेन? मी कुठल्या जातीचा द्वेष करत नाही आन् सोत्ताच्या जातीचा कड बी वढत नाय. मी वृत्तीवर ल्हीतो. त्याला इचारलं, “बाबा मी कुठल्या जातीवर ल्हीलंय. लिंक पाठव. त्यो सारवासारव कराय लागला. ओशाळवानं हसत म्हन्ला. तसं नाही हो. तुम्ही परवा अनाजीपंतांवर लिहीलं होतं. ते जरा…”
पुढे त्यांनी म्हटलं, “मी म्हन्लं, आरारारारा..लगा छ. शंभूराजांच्या जीवावर उठलेल्या अनाजीपंताच्या कारस्थानांसंबंधी पोस्ट केली. त्याच्या नीच वृत्तीबद्दल ल्हीलं मी. जातीचा उल्लेख बी नाय. त्याआधीच्या एका पोस्टमधी मी औरंगजेबाचीबी कारस्थानं लिहीली व्हती, तवा नाय तुमी ऑब्जेक्शन घेतलं? अनाजीपंतांबरोबरच शंभूराजांच्या जवळच्या नातेवाईकांनी केलेल्या गद्दारीवर बी लिहीलंय मी. अनाजीपंतच का खटकला? सोयीनं कसं जातीवर घेता तुमी?” किरण यांनी पोस्ट लिहत असताना अगदी रांगड्या भाषेचा वापर केला आहे.
आणखी वाचा – Photos : मालदीवमध्ये पोहोचल्या ‘आई कुठे काय करते’मधील कांचन आजी, नवऱ्यासोबत शेअर केले फोटो
शाहू महाराजांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी काय केलं? याचा उल्लेख देखील किरण यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे. किरण यांनी ही पोस्ट शेअर करताच तुम्ही खूप छान लिहिलं आहे. अशाप्रकारच्या कमेंट अनेकांनी केल्या आहेत. तसेच त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचं देखील नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.