आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच KRK हा सतत चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचं तो समीक्षण करत असतो. मध्यंतरी त्याने आमिर खानच्या चित्रपटाबद्दल विखारी शब्दांत टीका केली होती. दर दिवशी तो असं काहीतरी वादग्रस्त ट्वीट त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून करत असतो. ‘लाइगर’ या चित्रपटाबाबत केआरकेने ट्विट करून त्याचं मत व्यक्त केलं होत. केआरकेने हा चित्रपट सपशेल आपटणार असल्याची भविष्यवाणी केली होती. आता तो बहुचर्चित ;विक्रम वेधा; या चित्रपटाचं समीक्षण करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०२० मध्ये त्याने स्वर्गीय अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीट केलं होत. त्यासाठीच त्याला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर येताच तो पुन्हा ट्विटरवर सक्रिय झाला आहे. ‘विक्रम वेधा’ चित्रपटाच्या संदर्भात त्याने एक ट्विट केलं आहे ज्यात तो म्हणतो, ‘मी नक्कीच विक्रम वेधा चित्रपटाचं समीक्षण करेन फक्त चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बॉलीवूडने मला पुन्हा तुरुंगात टाकायला नको’.

जेव्हा सैफ अली खानने भर कार्यक्रमात उडवली होती हृतिक रोशनची खिल्ली म्हणाला…

यापूर्वी देखील KRK ने दावा केला होता की, ‘विक्रम वेधा’ मधील एक विशिष्ट सीन त्याच्या देशद्रोही चित्रपटातून कॉपी करण्यात आला होता. ‘विक्रम वेधा’ या तामिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक, सैफ हे दोघे एकमेकांना टक्कर देणार आहेत. मुळ चित्रपटात माधवन आणि विजय सेतुपती यांच्यातली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली तर या रिमेकमध्ये बॉलिवूडच्या या २ स्टार्सचा अभिनय आपल्याला बघायला मिळणार आहे.

केआरके हा हिंदी तसेच भोजपुरी चित्रपटात काम करणारा अभिनेता आहे. ‘एक व्हिलन’ या चित्रपटात त्याने काम केलं आहे. त्याला त्याच्या ‘देशद्रोही’ या चित्रपटावरून प्रचंड ट्रोल केलं जातं. यापेक्षा जास्त केआरके हा त्याच्या वादग्रस्त ट्विटसाठी आणि त्याच्या खास शैलीतल्या समीक्षणासाठी ओळखला जातो. तो बिग बॉस ३ या कार्यक्रमाचादेखील भाग होता.