बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू हा त्याच्या वेगळ्या भूमिकांसाठी कायम चर्चेत असतो. बालकलाकार म्हणून काम सुरू करणारा कुणाल खेमू हा सध्या बॉलिवूडमधला एक वेगळा आणि चांगला अभिनेता म्हणून ओळखला जातो. सैफ अली खानच्या बहिणीशी लग्न केल्यानंतर तो आणखीनच चर्चेत आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच त्याने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर स्वतःच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटाची घोषणा केली आहे. कुणालच्या या पहिल्या चित्रपटाचं नाव आहे ‘मडगांव एक्सप्रेस’. कुणालने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. कुणालने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “ही बातमी द्यायला यापेक्षा आणखीन कोणता शुभ दिवस मिळणार नाही. गणपती बाप्पाच्या कृपेने मी माझ्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरुवात करत आहे. त्याबद्दल एक्सेल एंटरटेंमेंटचे रीतेश सिदवानी आणि फरहान अख्तर यांचे मी मनापासून आभार मानतो. ‘मडगांव एक्सप्रेस’चे पोस्टर खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.”

मीडिया रीपोर्टनुसार बुलबुल चित्रपटात झळकलेला अविनाश तिवारी यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच स्कॅम १९९२ फेम प्रतीक गांधी आणि मिर्झापुरचा दिव्येंदूसारखे कलाकारही यात पाहायला मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. कुणाल खेमूचा हा पहिला दिग्दर्शित चित्रपट ‘दिल चाहता है’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ प्रमाणेच मैत्री आणि पर्यटन या २ गोष्टींशी निगडीत असणार आहे असं म्हंटलं जात आहे.

आणखी वाचा : Video : बहिण अर्पिताच्या घरी सलमान खानने केली बाप्पाची आरती

कुणालच्या या नवीन प्रयोगासाठी सगळेच उत्सुक आहेत. सगळेच त्याला यासाठी शुभेच्छा देत आहेत. गेल्याचवर्षी कुणाल खेमू हा ‘लूटकेस’ या चित्रपटात दिसला होता. यामध्ये त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. तसेच ‘गो गोवा गॉन’, ‘मलंग’सारख्या चित्रपटातून त्याने विनोदी आणि खलनायकाच्या भूमिकासुद्धा उत्कृष्टरित्या साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kunal khemu started his first film as director released first poster on instagram acount avn