Malhar Thakar Puja Joshi Wedding : ‘मजा मा’ फेम अभिनेता मल्हार ठाकर विवाहबंधनात अडकला आहे. मल्हार हा लोकप्रिय गुजराती अभिनेता असून त्याने अनेक हिंदी चित्रपटही केले आहेत. मल्हारने अभिनेत्री पूजा जोशीशी लग्नगाठ बांधली. मंगळवारी (२६ नोव्हेंबर रोजी) मल्हार व पूजाचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मल्हार व पूजा यांच्या अफेअरच्या चर्चा खूप दिवसांपासून होत्या. अखेर त्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पोस्ट करून प्रेमाची कबुली दिली आणि त्यानंतर लग्नाची तारीख जाहीर केली होती. मेहंदी व हळदी समारंभानंतर या जोडप्याचं थाटामाटात लग्न झालं.

हेही वाचा – Video: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने २७ व्या वर्षी उरकला साखरपुडा; सुंदर व्हिडीओ शेअर करून दिली गुड न्यूज

पूजा जोशीने तिच्या लग्नात नक्षीदार पारंपरिक लाल लेहेंगा परिधान केला होता. त्याबरोबर तिने मॅचिंग दागिने घातले होते. तिने तिचा हा लूक न्यूड मेकअपने पूर्ण केला. तर, मल्हारने आयव्हरी रंगाची शेरवानी घातली होती.

मल्हार ठाकर व पूजा जोशीच्या लग्नातील फोटो (फोटो – इन्स्टाग्राम)

पूजाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या लग्नातील अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे दोघे लग्नाचे विधी करताना दिसत आहेत. ‘मी आणि मी, आता आम्ही झालो आहोत’, असं कॅप्शन देऊन पूजाने फोटो पोस्ट केले आहेत.

हेही वाचा – नागा चैतन्यच्या लग्नाआधी सावत्र भावाने दिली गुड न्यूज; साखरपुड्याचे फोटो केले शेअर, ८ वर्षांपूर्वी मोडलेलं लग्न

लोकप्रिय अभिनेता आहे मल्हार

मल्हार ठाकर हा गुजराती चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने ‘छेल्लो दिवस’ (२०१५) या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने ‘लव्ह नी भवाई’, ‘शर्तो लागू’ आणि ‘गोळकेरी’सारखे हिट चित्रपट दिले आहेत. मल्हारचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याने माधुरी दीक्षितची मुख्य भूमिका असलेल्या ‘मजा मा’ सिनेमातही काम केलं होतं. पूजा व मल्हार यांनी ‘वात वात मा’ या शोमध्ये एकत्र झळकले होते.

हेही वाचा – प्राजक्ता माळीचा देवावर विश्वास आहे का? चाहत्याच्या प्रश्नाचं एका शब्दात दिलं उत्तर, म्हणाली…

मल्हारची पत्नी पूजा जोशी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘छुटा छेडा’ या हिट टीव्ही मालिकेतील भूमिकेसाठी ती ओळखली जाते. तिने ‘गुज्जूभाई द ग्रेट’ (२०१५) सिनेमातून तिच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. तिने ‘आवी रमत नी रुतू’ (२०१६) आणि ‘तंबुरो’ (२०१७) या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor malhar thakar married to actress puja joshi wedding photos out hrc