अभिनेते मिथुन चक्रवर्ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. तसेच मिथुन यांच्या कुटुंबातील व्यक्तींची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते. त्यांची सून आणि अभिनेत्री मदलसा शर्मा (Madalsa Sharma) एक उत्तम अभिनेत्री आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’मध्ये (Anupama) ती काव्याची भूमिका साकारत आहे. पण सुपरस्टार अभिनेत्याची सून असून देखील तिला कास्टिंग काउचसारख्या समस्यांचा सामना करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – भारतात सुपरफ्लॉप पण परदेशात ‘लाल सिंग चड्ढा’ची कमाल, चीनमध्येही चित्रपट प्रदर्शित होणार?

मध्यंतरी एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मदलसाने याबाबत खुलासा केला. ती म्हणाली, “आजच्या काळामध्ये मुलगा किंवा मुलगी असणं धोकादायक आहे. एक कलाकार म्हणून वाईट लोकांपासून लवकरात लवकर दूर होणं हा तुमचा निर्णय असतो. वाईट आणि चांगल्या या दोन्ही गोष्टी आपल्याबरोबरच असतात. आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे हे आपण ठरवायचं असतं.”

“लोक तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतील पण आपला स्वतःचा निर्णय, मत ते बदलू शकत नाहीत. मला देखील काही विचित्र प्रसंगांचा सामना करावा लागला. कधीकधी मीटिंगमध्ये लोक माझ्याबरोबर विचित्र पद्धतीने वागायचे. मग अशावेळी त्या लोकांकडे दुर्लक्ष करत मी तिथून निघून जायचे. मला तिथून बाहेर पडण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. कोणाची तितकी हिंमतही नाही.”

आणखी वाचा – “तू आमच्यात असशील…” सोनाली कुलकर्णीच्या आवडत्या व्यक्तीचं निधन, शेअर केला भावुक व्हिडीओ

तसेच एक कलाकार म्हणून आपलं आयुष्य कसं जगायचं? प्रत्येक प्रसंगांना कसं सामोर गेलं पाहिजे? हे मदलसाला बरोबर ठाऊक आहे असंही तिने सांगितलं. मदलसाच नव्हे तर कलाक्षेत्रामधील इतर अभिनेत्रींनाही अशाप्रकारच्या समस्यांना सामोर जावं लागलं. याबाबत काही अभिनेत्रींनी अनेकदा खुलेपणाने सांगितलं आहे.