ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंडतर्फे दिला जाणारा सु. ल. गद्रे पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रविवार, १ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुलुंड येथील संस्थेच्या सभागृहात होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांना दिला जाणार आहे.
‘घाशीराम कोतवाल’ या नाटकापासून सुरू झालेला डॉ. मोहन आगाशे यांचा रंगभूमीवरचा प्रवास, अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमधील विविध भूमिका तसेच टीव्हीवरील मराठी-हिंदी मालिकांमध्ये काम करून रसिकप्रिय अभिनेते म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. २५ हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार सोहळ्यानंतर ‘व्हय मी सावित्रीबाई’ हा एकपात्री प्रयोग सुषमा देशपांडे सादर करणार आहेत. कार्यक्रम तसेच प्रयोग पाहण्यासाठी सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा