नव्वदच्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शक्तिमान’. या काळात हा कार्यक्रम न पाहणारा प्रेक्षक क्वचितच तुम्हाला सापडेल. आजही प्रत्येक मुलाला आपलं बालपण आठवलं की ‘शक्तिमान’ डोळ्यांपुढे उभा राहतो. आता पुन्हा एकदा हिच जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. पण यावेळी मालिका नव्हे तर चित्रपटाच्या माध्यमातून ‘शक्तिमान’ साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

आणखी वाचा – Photos : सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का?, लंडनमध्ये थाटामाटात पार पडला कार्यक्रम

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
tejashri pradhan shares post about her hashtag tadev lagnam marathi movie not enough screens
सिनेमा हाऊसफुल, तरीही थिएटर नाहीत…; तेजश्री प्रधानची खंत! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटासाठी पोस्ट करत म्हणाली…
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान अभिनेते मुकेश खन्ना यांनी या चित्रपटाबाबत काही गोष्टी सांगितल्या. “हा चित्रपट माझ्याकडे कित्येक वर्षांनी आला आहे. बरेच लोक मला बोलत होते की ‘शक्तिमान’चं दुसरं सीझन यायला पाहिजे. पण यावेळी मला ‘शक्तिमान’ छोट्या पडद्यावर नाही तर चित्रपटामध्ये हवा होता.” असं मुकेश यांनी यावेळी सांगितलं.

ते पुढे बोलताना म्हणाले, “सोनी पिक्चर्सबरोबर मी या चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे. त्यांनी देखील या चित्रपटाबाबत उघडपणे सांगितलं आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असणार आहे. जवळपास ३०० कोटी रुपये बजेट असणारा हा चित्रपट आहे. यापेक्षा अधिक मी या चित्रपटाबाबत बोलू शकत नाही.” ३०० कोटी रुपयांचा बजेट असणाऱ्या या चित्रपटामध्ये बऱ्याच नव्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.”

आणखी वाचा – सलग तीन चित्रपट सुपरफ्लॉप, तरीही अक्षयने घेतला मोठा निर्णय, आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ला देणार टक्कर

तसेच या चित्रपटाच्या कथेबाबत देखील ते खुलेपणाने बोलत होते. “या चित्रपटाची कथा मी माझ्याप्रमाणेच तयार करुन घेतली आहे. ‘शक्तिमान’च्या कथेमध्ये कोणताच बदल नको अशी मी एक अट ठेवली होती.” असं त्यांनी सांगितलं. चित्रपटात शक्तीमान कोण असणार? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, “जर दुसऱ्या कोणी अभिनेत्याने शक्तीमानची भूमिका साकारली तर देश त्याचा स्वीकार करणार नाही.” पण या चित्रपटासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Story img Loader