गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतील अनेकांना करोनाची लागण झाली आहे. बॉलिवूडकरांना करोनाने विळखा घातल्यानंतर आता मालिकेतील कलाकारांनाही करोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेतील अभिनेता नकुल मेहताला करोनाची लागण झाली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

नकुल मेहताने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यासोबत त्याने करोनाची लढाई लढत असल्याची माहिती दिली आहे. तसेच या पोस्टद्वारे त्याने चाहत्यांना तब्येतीबाबतही सांगितले आहे. यातील पहिल्या फोटोत काही गोळ्या दिसत आहेत. त्यानतंर दुसऱ्या फोटो नेटफिल्क्स आणि तिसऱ्या फोटोत गरम गरम जेवण दिसत आहे. त्यानंतर नकुलने स्वत:चा एक सेल्फी शेअर केला आहे.

याला कॅप्शन देताना तो कशाप्रकारे कोव्हिडला मात देत आहे हे त्याने सांगितले आहे. “विल स्मिथ, गोळ्या, नेटफ्लिक्स, स्फॉटिफाय, अली सेठीचा आवाज, ख्रिसमस लाईट्स, माझी डायरी आणि माझ्या घरातल्या बाईने बनवलेले जेवण हे सर्व मला कोव्हिडवर मात करण्यासाठी मदत करत आहे,” असे नकुलने लिहिले आहे.

नकुल मेहताच्या या पोस्टनंतर करण ग्रोवर, करण पटेल, गौतम रोडे यांच्यासह सर्व सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. या सर्वांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नकुल मेहता हा दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर परतला आहे. नुकतंच तो ‘बडे अच्छे लगते हैं २’ मध्ये दिसला होता. यापूर्वी त्याने ‘इश्कबाज’ मालिकेत भूमिका साकारली आहे. नकुल हा यावर्षी एका मुलाचा पिता झाला. त्याच्या दोन महिन्यांच्या मुलावरही शस्त्रक्रिया झाली होती. ज्याबद्दल अभिनेत्याने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. त्याने त्यांच्या मुलाचे नाव सूफी ठेवले आहे.