आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडणारा अभिनेता म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखले जाते. तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकतंच नवाजुद्दीने सिद्दीकीने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्याने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात चर्चा असलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल वक्तव्य केले.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. सर्वत्र सध्या या चित्रपटाचं कौतुक होताना दिसत आहे. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. नुकतंच ‘एबीपी आयडियाज ऑफ इंडिया’च्या कार्यक्रमात नवाजुद्दीने या चित्रपटाबद्दल त्याचे मत व्यक्त केले. तसेच या चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावरही त्याने भाष्य केले.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार

या चित्रपटावरुन बॉलिवूडसह सर्वसामान्य जनतेत दोन गट पडलेत असे तुला वाटतं का? यावर प्रतिक्रिया देताना नवाज म्हणाला, मी अद्याप हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही. मात्र लवकरच हा चित्रपट पाहणार हे नक्की आहे. या चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये फूट पडली की नाही याची मला कल्पना नाही. पण एखादा चित्रपट बनवण्यामागे प्रत्येक दिग्दर्शकाचा त्याचा एक वेगळा दृष्टीकोन असतो. त्यांनी त्यांच्या दृष्टीकोनातून हा चित्रपट बनवला. अनेक दिग्दर्शक हे त्यांच्या त्यांच्या दृष्टीकोनातून हा चित्रपट बनवत आहेत”, असेही नवाजुद्दीन सिद्दीकीने म्हटले.

“मी अद्याप हा चित्रपट पाहिला नाही. पण मी तो नक्की पाहणार आहे. मात्र चित्रपटांमध्ये काही गोष्टी जोडल्या देखील जातात. पण दिग्दर्शक जेव्हा असे चित्रपट बनवतील. तेव्हा साहजिकच ते याची सत्यता तपासूनच हा चित्रपट बनवतील, याची मला खात्री आहे”, असेही त्याने सांगितले.

महाराष्ट्रात ‘द कश्मीर फाइल्स’ टॅक्स फ्री केला जाणार का? आदित्य ठाकरे म्हणतात…

नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या ‘टिकू वेड्स शेरु’ या चित्रपटात व्यस्त आहे. कंगना रणौत ही या चित्रपटाची निर्मिती करत आहे. कंगना निर्मिती करत असलेल्या या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर हे कलाकार स्क्रीन शेअर करत आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर यांनी केले आहे. तर कंगनाच्या प्रॉडक्शन हाऊस ‘मणिकर्णिका फिल्म्स’ अंतर्गत याची निर्मिती केली जात आहे. हा तिचा पहिला डिजीटल चित्रपट असणार आहे.

Story img Loader