दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजने आतापर्यंत काही निवड चित्रपटांची निवड केली असून त्याचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले गाजले आहेत. त्यामुळे अभिनयाच्या जोरावर त्याने त्याचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सुरुवातीला लहान भूमिका साकारणारा हा अभिनेता आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता झाला आहे. नवाज लवकरच ‘फोटोग्राफ’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याने छायाचित्रकाराची भूमिका साकारली असून ही भूमिका वठविण्यासाठी त्याने एका खास व्यक्तीकडून प्रेरणा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

रितेश बत्रा दिग्दर्शित ‘फोटोग्राफ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये नवाज आणि सान्य मल्होत्रा या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. फोटोग्राफमध्ये नवाजने ‘रफी’ या फोटोग्राफरची भूमिका वठविली असून ही भूमिका साकारण्यासाठी त्याने एका खऱ्याखुऱ्या फोटोग्राफरकडून प्रेरणा घेतली आहे. विशेष म्हणजे फोटोग्राफर्सना ट्रिब्यूट देण्यासाठी या चित्रपटाचा एक विशेष शो चित्रपटाच्या टीमकडून आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, फोटोग्राफ हा चित्रपट धारावीमधील एका फोटोग्राफरच्या जीवनावर आधारित असून नवाजचा रितेश बत्रा यांच्यासोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. तर सान्या पहिल्यांदाच नवाजसोबत पहिलाच चित्रपट आहे. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचं वर्ल्ड प्रीमियर झाले असून बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील हा चित्रपट दाखविण्यात आला आहे.

Story img Loader