छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ हा शो लोकप्रिय मराठी कॉमेडी शो आहे. या कार्यक्रमातील सूत्रसंचालक डॉ निलेश साबळे हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. लवकरच झी मराठी वाहिनीवरील सत्यवान सावित्री ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत वेदांगी कुलकर्णी आणि आदित्य दुर्वे सत्यवान सावित्रीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. नुकतंच या मालिकेच्या निमित्ताने निलेश साबळेने त्याच्या पत्नीबद्दलच्या खास गोष्टी शेअर केली आहे.

डॉ. निलेश साबळे याने पत्नी डॉ. गौरी साबळेबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी तो म्हणाला, “खरं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सावित्री फार महत्वाची असते ती म्हणजे आपली अर्धांगिनी. प्रत्येकाच्या आयुष्यात पत्नी ही महत्त्वाची असते. तशीच माझ्याही आयुष्यात आहे आणि तिचं नाव डॉ गौरी साबळे असं आहे. आज आमच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. या सगळ्या प्रवासात तिने मला उत्तम साथ दिली.”

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Shocking video Husband took VRS due to wife's illness, wife died on the day of retirement
“नियतीचा खेळ” पत्नीच्या आजारपणामुळे लवकर रिटायरमेंट घेतली, पण निरोप समारंभातच तिने साथ सोडली; VIDEO पाहून धक्का बसेल
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक
emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

“आपण आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करतो कारण…”, चाहत्याच्या ‘त्या’ कृतीने संदीप पाठक भारावला

“आमचा प्रेमविवाह झाला आहे. त्यावेळी मी काहीच कमवत नव्हतो. पण तिने मला होकार दिला. त्यावेळी तिने मला विचारलं होतं की तू प्रॅक्टिस करशील की आवडत्या क्षेत्रात करिअर करशील? तिच्या या प्रश्नावर उत्तर देताना मी म्हटलं होतं की, मी कदाचित प्रॅक्टिस करणार नाही. पण तिने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला. यानंतर ती मला म्हणाली होती जर तुला लवकर काम मिळालं नाही तर मी तुझ्याबरोबर आहे. मी प्रॅक्टिस करेन आणि घर चालवेन, पण तुला ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रात जा”, असे निलेश साबळे म्हणाले.

“ती उत्तम कलाकार आहे, ती छान गाते, तिला चित्रकलेची खूप आवड आहे. पण या सगळ्या कला तिच्याकडे असताना सुद्धा केवळ आणि केवळ मला पुढे जाता यावं म्हणून ती या कलांकडे आतापर्यंत दुर्लक्ष करत आली. मला वाटतं आता तिने त्या कलांकडे लक्ष दिलं पाहिजे. माझ्या प्रत्येक गोष्टीत ती माझी साथ देते. माझं जास्त जागरण होऊ नये म्हणून तिने लिखाण, एडिटींगसुद्धा शिकून घेतलं आहे. ती विनोद सुचवते, वेगवेगळ्या कल्पना मांडते या सगळ्या गोष्टीत ती फार चांगल्यारितीने सहभाग दर्शवते”, असेही त्याने म्हटले.

“काही तांत्रिक अडचणींमुळे…”, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील विवाह विशेष भागाबद्दल ‘झी मराठी’चे स्पष्टीकरण

“मला माझ्या कामात आनंद मिळावा, असे तिला सतत वाटत असते. ती माझी सावित्री आहे. मला तिचा खूप अभिमान वाटतो”, असेही तो म्हणाला. दरम्यान २०१३ साली निलेश साबळे आणि गौरीचा विवाह संपन्न झाला होता. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना या दोघांची भेट झाली. तिथेच निलेशला गौरी आवडू लागली. लेखन, निवेदन, अभिनेता आणि दिग्दर्शन अशा विविध भूमिकेत दिसणाऱ्या निलेश सबळे आयुर्वेदिक डॉक्टर आहे. यासाठी आवश्यक पदवीही त्याने घेतली आहे. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या कर्तृत्ववावर त्याने मराठी सिनेसृष्टीत ओळख निर्माण केली आहे. ​

Story img Loader