रेश्मा राईकवार

गेल्या काही वर्षांत चरित्र भूमिका ते मध्यवर्ती भूमिका असा पल्ला गाठलेल्या अभिनेता पंकज त्रिपाठी यांचा नेहमीपेक्षा वेगळया धाटणीचा चित्रपट म्हणून ‘कडक सिंग’कडून खूप अपेक्षा होत्या. आर्थिक गुन्हे विभागातील एक अधिकारी, त्याचे व्यक्तिमत्त्व, तो करत असलेला तपास आणि कुटुंबातील ताणेबाणे असे काहीसे गुंतागुंतीचे कथानक असलेला हा चित्रपट खिळवून ठेवणारा थरार वा रहस्यपट असल्याचे ट्रेलरवरून वाटते. प्रत्यक्षात वेगळया मांडणीचा केवळ भासच आहे हे जाणवल्यानंतर कडकडीत निराशा प्रेक्षकांच्या पदरी येते.

Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…

‘झी ५’ वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘कडक सिंग’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केलं आहे आणि लेखन रितेश शाह यांचं आहे. याच लेखक – दिग्दर्शक जोडीने अतिशय सुंदर आणि महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा ‘पिंक’ चित्रपट दिला होता. त्यामुळे साहजिकच पंकज त्रिपाठी यांना मुख्य भूमिकेत घेऊन केलेला ‘कडक सिंग’ही काही वेगळा अनुभव देईल असं वाटणं साहिजक आहे. या चित्रपटाची कथा थोडी वेगळी आहे. रहस्यही आहे आणि त्याचा शोधही घेतला जातो. मात्र कथेनुसार अतिशय हुशार असा आर्थिक गुन्हे विभागातील तपास अधिकारी अरुण कुमार श्रीवास्तव ऊर्फ ए. के. रुग्णालयात आहे. त्यामुळे बराचसा कथाभाग रुग्णालय आणि मग त्याच्या अवतीभोवती फिरतो. महत्त्वाच्या चिट फंड घोटाळयाचा तपास करणाऱ्या ए. के. ने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यातून तो वाचला असला तरी आपल्या आयुष्यात घडलेल्या काही वर्षांपूर्वीच्या निवडक घटना आणि माणसं सोडली तर त्याला काहीही आठवत नाही आहे. खरोखरच ए. के. सारख्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, स्वभावाने रोखठोक अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे? आणि त्याने तसा प्रयत्न केला असेल तर त्यामागचं नेमकं कारण काय? तो ज्या घोटाळयाचा तपास करत होता त्याच्याशी संबंधित गोष्टींच्या दबावामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं की तो स्वत:च त्या घोटाळयात अडकला आहे? अशा प्रश्नांची मालिकाच उभी केली जाते. या प्रश्नांची निश्चित उत्तरं ए.के. कडेच आहेत, पण त्यालाच स्वत:ला काही आठवत नसल्याने एकेकाळी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गौरवल्या गेलेल्या ए. के.ला सध्या भ्रष्टाचारी म्हणून संशयित नजरेनं बघितलं जात आहे. ए. के. त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींकडून आत्तापर्यंत काय काय घडलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाकडून तो स्वत:ची वेगळी गोष्ट तरी ऐकतो किंवा वेगवेगळया दृष्टिकोनातून तरी ऐकतो. यातली त्याची खरी गोष्ट त्याला सापडेल का? या प्रश्नाचा शोध म्हणजे हा चित्रपट म्हणता येईल.

हेही वाचा >>> नातीचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ बच्चन भारावले, सोशल मीडियावर पोस्ट करत आराध्याविषयी म्हणाले, “अभिमानास्पद क्षण…”

या चित्रपटाच्या नावापासूनच काहीसा घोळ सुरू होतो. ए. के. एका दुर्घटनेत पत्नीला गमावतो. त्यानंतर एकटयाने दोन मुलांचा सांभाळ आणि कामाच्या ठिकाणी कुठेही कमी पडू नये यासाठीची धडपड यांत तो मुलांपासून दूर होत जातो. आपले वडील घरात कडक शिस्तीने वागतात आणि आपल्यालाही वागायला लावतात, मात्र त्यांच्याकडे आपल्याला द्यायला वेळ नाही, प्रेम नाही या भावनेतून एकटयाने जगणाऱ्या मुलांनी त्याला कडक सिंग हे नाव देऊन टाकलं आहे. पण चित्रपटात जेव्हा ए. के. मुलीकडून त्याची गोष्ट ऐकतो किंवा इतरांकडून त्याच्याविषयी ऐकतो तेव्हा तो नावाप्रमाणे कुठेही कडक वाटत नाही. वरवर कठोर दिसणारा अधिकारी आणि आतून भावुक बाप असं त्याचं चित्रण लेखक – दिग्दर्शकाने केलं आहे. यातल्या रहस्याचा शोध घेण्याचं प्रकरणही फार गुंतागुंतीचं नाही. एका मोठया घोटाळयाची पोलखोल आणि आर्थिक गुन्हे विभागातील अधिकाऱ्यांचे या प्रकरणाशी असलेले लागेबांधे हा सगळा कथाप्रकार प्रेक्षकांच्या आधीच लक्षात येतो, त्यामुळे आता ए. के. ते सिद्ध कसं करणार ही एकच गोष्ट औत्सुक्य वाढवणारी असते आणि या संपूर्ण रहस्याची उकल शेवटच्या काही दहा मिनिटांत ए. के.च्या तोंडून ऐकायला मिळते तेव्हा ना त्यात थरार जाणवत, ना काही शोधून काढण्यातली गंमत..

लेखनातच विसविशीत असलेला हा चित्रपट त्या तुलनेत वास्तववादी पद्धतीच्या मांडणीमुळे काहीसा सुसह्य वाटतो. पंकज त्रिपाठी या कमालीच्या चतुरस्र अभिनेत्याकडून कडक सिंग खूप प्रभावी पद्धतीने काढून घेण्याची संधी दिग्दर्शकाकडे होती, पण त्याचा अजिबात उपयोग करून घेतलेला नाही. आजवरच्या भूमिकांमध्ये मध्यमवर्गीय सोशिक किंवा अगदीच कुख्यात गुंड अशा टोकाच्या व्यक्तिरेखा केलेले पंकज त्रिपाठी इथे रुबाबदार तपास अधिकाऱ्याच्या रूपात समोर येतात. मात्र तशा प्रकारे अ‍ॅक्शनदृश्ये वा काही भरीव प्रसंग त्यांच्या वाटयाला आलेला नाही. उलट ए.के. आणि त्यांची मुलगी अभिनेत्री संजना सांघी यांच्यातील प्रसंग बऱ्यापैकी चांगले चित्रित झाले आहेत. संजना, ए.के.च्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री जया एहसान, परिचारिका कन्नन अशा काही मोजक्या व्यक्तिरेखा आणि त्या कलाकारांच्या अभिनयामुळे ‘कडक सिंग’ची गोष्ट पाहावीशी वाटते. ज्या पद्धतीने गुंतागुंतीची कथा असावी असा आभास ट्रेलरमधून निर्माण केला जातो त्या पद्धतीची उत्कंठावर्धक मांडणी चित्रपटात असती तर कदाचित हा कडक सिंग प्रभावी दृश्यानुभव ठरला असता.

कडक सिंग

दिग्दर्शक – अनिरुद्ध रॉय चौधरी

कलाकार – पंकज त्रिपाठी, संजना सांघी, जया एहसान, परेश पहुजा, पार्वती थिरुवोथु.