बॉलिवूडमध्ये भरपूर नाव कमावले असले तरी अभिनेता पंकज त्रिपाठीला त्याच्या गावच्या मातीची ओढ कायम असते. शूटिंगमधून वेळ काढत तो आवर्जून त्याच्या गावी बिहारमधील गोपालगंजला भेट देत असतो. आताही तो त्याच्या गावी गेला आहे. मात्र यावेळी सुट्टी एन्जॉय करायला नाही तर, एका खास कारणासाठी तो तेथे पोहोचला आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी एक अभियान घेऊन गावाला गेला आहे. या अभियानाचे नाव आहे ‘पर्यावरणासाठी सजगता अभियान.’ त्यानं या चांगल्या कामाची सुरुवात स्वतःच्या गावापासूनच केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : जगभरात प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेबाबत ऐतिहासिक निर्णय

पंकज त्रिपाठी गोपालगंजजवळ बेलसंड गावात आला आहे. या पर्यावरण अभियानाबद्दल बोलताना तो म्हणतो, “ही खूप जुनी योजना आहे. वृक्षारोपण हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्या गावात जाणाऱ्या रस्त्यावर एक किलोमीटर एकही झाड नव्हतं, हिरवळ नव्हती. म्हणूनच इथे झाडं लावणं गरजेचं आहे. गावातल्या लोकांचा या वृक्षारोपण अभियानात सहभाग आहेच. त्याचबरोबर जिल्हा प्रसासनही मदत करत आहे. ५०० झाडं लावण्याचं आम्ही ठरवलं आहे. यामुळे लोकांमध्ये वृक्षारोपणाची जागृती वाढत आहे. रविवारी सुरू झालेल्या या अभियाना अंतर्गत आतापर्यंत ५१ झाडं लाऊन झालेली आहेत.”

आणखी वाचा : अभिनेत्री महिमा चौधरी यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपटातील फर्स्ट लूक आउट, दिसणार ‘या’ भूमिकेत

यावेळी पंकज त्रिपाठीचा भाऊ, विजेंद्र तिवारीही उपस्थित होता. त्याने या अभियानाबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. तो म्हणाला, “आमचे वडील बनारस तिवारी आणि आई हेमवती देवीच्या नावे ट्रस्ट केलाय. या ट्रस्टच्या वतीनं वृक्षारोपण केलं आहे. झाडांच्या निगराणीसाठी फाऊंडेशननं माणसं नियुक्त केली आहेत. ही मंडळी पुढील पाच वर्षं झाडांची देखभाल करतील. पुढची पिढी निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त झाडांची गरज आहे.” पंजक त्रिपाठी याने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत असून त्याला या अभियानासाठी सगळेजण शुभेच्छा देत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor pankaj tripathi started new mission at his village to save environment rnv