अभिनेता पंकज त्रिपाठी यांचे लाखो चाहते आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल. पंकज त्रिपाठी यांनी चित्रपटात किंवा वेबसीरिजमध्ये साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भावते. शहनाजचं देखील असंच काहीसं आहे. पंकज यांची खूप मोठी फॅन असल्याचं शहनाजने स्वतःचं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पंकज यांना याबाबतच एक प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबाबत त्यांनी एक खुलासा केला आहे.

आणखी वाचा – लग्न, घटस्फोट, दोनवेळा गर्भपात, कर्करोग अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

कनेक्ट एफएम कॅनडाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शहनाजने तुमचं तोंडभरून कौतुक केलं असं पंकज त्रिपाठी यांना मुलाखतीदरम्यान सांगण्यात आलं. तेव्हा त्यांनी शहनाजचे आभार मानत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचाही उल्लेख केला. त्यांच्या बोलण्यामधून शहनाज-सिद्धार्थचा पंकज अगदी मनापासून आदर करतात हे दिसून आलं.

“हो. अभिनेता म्हणून शहनाज गिलला मी आवडतो. त्यासाठी मी तिचा आभारी आहे. तुम्ही आता शहनाजबद्दल बोललात आणि मला सिद्धार्थ शुक्लाची आठवण आली. सिद्धार्थ शुक्ला माझा खूप आदर करायचा. ही गोष्ट खूप लोकांना माहित नाही आणि मी कधी सांगितली नाही. आमच्या दोघांचं एकमेकांशी चांगलं नातं होतं.” असं पंकज त्रिपाठी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.

आणखी वाचा – “समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय?” शरद पोंक्षे म्हणतात…

पंकज आणि सिद्धार्थ यांचं नातं खऱ्या आयुष्यात अधिक चांगलं होतं हे आता समोर आलं आहे. पंकज यांच्या कामाबाबत बोलायचं झालं तर त्यांच्या हाती सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. ‘क्रिमिनल जस्टिस २’ या वेबसीरिजमध्ये त्यांनी साकारलेली भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Story img Loader