मराठीमध्ये एकापोठापाठ एक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ऐतिहासिक चित्रपटांकडे प्रेक्षकांचा ओढा देखील वाढला आहे. अशामध्येच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे, ‘गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आणि प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता आणखीनच वाढली. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – VIDEO : लंडनमध्ये प्रवीण तरडे यांनी जपली मराठी संस्कृती, म्हणाले, “इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की…”

अमोल कोल्हे यांच्यासाठी या चित्रपटाचं चित्रीकरण करणं अधिक आव्हानात्मक होतं. ‘गरुडझेप’च्या संपूर्ण टीमची यामागे प्रचंड मेहनत आहे. आग्रा येथील लाल किल्ल्यामध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झालं. पण येथे चित्रीकरण करणं अशक्य होतं. यासाठी कितीपत मेहनत घ्यावी लागली हे अमोल कोल्हे यांनी व्हिडीओच्या माध्यामातून सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटलं की, “अशा वातावरणात चित्रीकरण करणं म्हणजे वेडेपणा आहे. आग्र्याच्या लाल किल्ल्यात चित्रीकरण? कसं शक्य आहे? अनेकांच्या अनेक शंका…पण प्रत्यक्ष इतिहास जणू ३५६ वर्षांनंतर त्या घटनेला कॅमेऱ्याच्या लेन्समधून पाहणार होता. एएसआय नियमावलीचे पालन करता करता होणारी दमछाक, त्यात सकाळी ९ वाजता ३८-४० डिग्री तापमान. चुकून टाचणी विसरली तरी किल्ल्यातून बेस कॅम्पपर्यंत पायपीट, ना बसायला खुर्ची ना पंखा. सावलीसाठी आडोशाला उभं राहावं तर घामाच्या धारा आणि जरा हवेशीर ठिकाणी उभं राहावं तर उन्हाच्या झळा. रोज ४-५ जणं अंथरूण धरायचे नाहीतर थेट रूग्णालयामध्ये भरती. तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ या ईर्षेने चित्रीकरण सुरु.”

आणखी वाचा – साखरपुडा, ब्रेकअप अन् पुन्हा २० वर्षांनी लग्न, जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेकचा विवाहसोहळा संपन्न

अमोल कोल्हे यांनी चित्रपटाच्या टीमचंही भरभरुन कौतुक केलं. चित्रपटाचा टीझर पाहता यामध्ये दमदार संवाद आणि उत्तम चित्रण पाहायला मिळणार असं दिसतंय. जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor politician amol kolhe share historical movie garudjhep shooting video says difficult to shoot film at agra fort kmd
First published on: 18-07-2022 at 18:19 IST