दक्षिणात्य अभिनेता प्रभास हा सध्या त्याच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला असतानाच चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रभास मात्र चित्रपटाशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमात दिसलेला नाही. चित्रपटावर होणाऱ्या टीकेवर प्रभासने मौन बाळगलं आहे. तर सध्या तो अमेरिकेमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अशातच त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बाहुबली’ चित्रपटानंतर प्रभास जगभरात लोकप्रिय झाला. या चित्रपटाने त्याला नवी ओळख मिळवून दिली. तर यानंतर त्याने त्याच्या मानधनातही प्रचंड मोठी वाढ केली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटासाठी त्याने दीडशे कोटी मानधन आकारल्याचं बोललं गेलं. त्याने त्याच्या कमाईच्या काही भागातून इटलीमध्ये आलिशान व्हिला खरेदी केला आहे. हा व्हिला त्याने पर्यटकांना वापरण्यासाठीही खुला केला आहे. या त्याच्या व्हिलाचं भाडं किती ते आता समोर आलं आहे.

आणखी वाचा : “लग्न कधी करणार?” चाहत्याच्या प्रश्नावर प्रभासने सोडलं मौन, विवाहस्थळाचा खुलासा करत म्हणाला…

मीडिया रिपोर्ट्समुसार, शूटिंगमधून वेळ मिळाला की प्रभास या त्याच्या इटलीच्या आलिशान घरी जातो आणि त्याच्या मित्रांबरोबर वेळ घालवतो. पण जेव्हा तो शूटिंग करत असतो आणि तेव्हा हा व्हिला तो पर्यटकांना राहायला देतो. हा व्हिला भाड्याने देऊन प्रभास चांगलीच कमाई करतो. या व्हिलामध्ये पर्यटक राहायला येतात त्यातून प्रभासला दरमहा ४० लाख रुपये मिळतात.

हेही वाचा : “प्रभास, सैफ अली खान खूप…,” तेजस्विनी पंडितने शेअर केला ‘आदिपुरुष’मध्ये काम करण्याचा अनुभव

दरम्यान, त्याच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर त्यानंतर आता प्रभास सलार, प्रोजेक्ट के, स्पिरिट, राजा डिलक्स यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आदिपुरुष’वर झालेल्या टीकेनंतर प्रभासचे हे चित्रपट किती कमाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor prabhas rent his italy villa to tourist and earns huge amount know about the rent rnv