दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवलेल्या चित्त्यांपैकी आणखी एकाचा चित्त्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या चित्त्यांमध्ये झालेल्या झुंजीत ‘दक्षा’ या मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. ‘दक्षा’सह आतापर्यंत तीन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणावरुन अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकाश राज हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. प्रकाश राज यांनी एएनआय या वृत्तसंस्थेचे एक ट्वीट रिट्वीट करत मोदींना सवाल विचारला आहे.
आणखी वाचा : कुनो राष्ट्रीय उद्यानातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू; ‘हे’ कारण आलं समोर

“५६ इंचाची छाती असणारे सेल्फी किंग आता कुठे आहेत, ज्यांनी या चित्त्यांना इथे आणण्याचे क्रेडीट घेतले होते”, असे ट्वीट प्रकाश राज यांनी केले आहे. या ट्वीटबरोबर त्यांनी ‘सहजच विचारतोय’, असा हॅशटॅगही पोस्ट केला आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील नामिबियातून मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात २० चित्ते आणले गेले होते. यातील तीन चित्त्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला होता. सर्वात पहिल्यांदा ‘साशा’ या मादी चित्त्याचा २७ मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला होता. तर, ‘उदय’ हा चित्ता २३ एप्रिलला निश्चल अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर त्याचाही मृत्यू झाला. त्यातच मंगळवारी ( ९ मे ) ‘दक्षा’ या मादी चित्त्याचा मृत्यू झाला.

आणखी वाचा : “‘द केरला स्टोरी’ला मराठी सिनेसृष्टी पाठिंबा का देत नाही?” अमृता खानविलकर म्हणाली “कारण ‘महाराष्ट्र शाहीर’…”

नर ‘वायू’, ‘फिंडा’ आणि ‘अग्नि’ या चित्त्यांची मादी ‘दक्षा’बरोबर झुंज झाली. या झुंजीत ‘दक्षा’ गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर ‘दक्षा’चा मृत्यू झाला आहे. यामुळे आता कुनो उद्यानात २० पैकी १७ चित्ते उरले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor prakash raj angry on pm narendra modi after kuno national park female cheetah daksha dies see tweet nrp
Show comments