अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. ते राजकीय विषयांवर त्यांची मतं ठामपणे मांडत असतात. ते विशेषतः केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना दिसतात. नुकतीच त्यांनी नरेंद्र मोदींच्या वेषभूषेवर टीका केली होती. राजकीय मुद्द्यांच्याबरोबरीने ते चित्रपटसृष्टीबद्दल आपले मत मांडत असतात. सध्या दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडला मागे टाकत आहेत. त्यावर एका मुलाखतीत त्यांनी भाष्य केलं आहे.
प्रकाश राज दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे आता बॉलिवूडमध्येदेखील काम करतात. गेली अनेकवर्ष ते चित्रपटसृष्टीत आहेत. लल्लनटॉप यांना दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले, “करोना काळापूर्वी एक ठरविक पद्धतीचे चित्रपट बनत होते. प्रेक्षकांना ते पाहावे लागत होते. करोना काळानंतर लोक ओटीटी प्लॅटफॉर्मवरकडे वळले आहेत. लोक आजकाल कन्टेन्ट बघतात स्टारडमवाले चित्रपट बघत नाहीत. कोणताही कलाकार स्टार बनू शकतो, चांगली कथा असेल तर चित्रपट नक्कीच प्रेक्षक बघतात. आता आमच्यापुढे एक आव्हान आहे, यावर आम्हाला आता विचार करावा लागेल कारण प्रेक्षकांची आवड त्यांचे स्वातंत्र्य असल्याने ते कोणतेही चित्रपट बघू शकतात. “
मतभेद बाजूला सारून लाडक्या लेकासाठी मलायका अरबाज आले एकत्र; नेटकरी म्हणाले…
ते पुढे म्हणाले “ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आम्हा कलाकरांना वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळत आहेत. बदल हे होतच असतात. आता प्रेक्षक कन्टेन्टशी जोडले जात आहे ही सर्वात महत्त्त्वाची गोष्ट आहे.” अशा शब्दात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्रकाश राज यांची नुकतीच ‘मुखबीर’ ही वेब सिरीज Zee5 वर प्रदर्शित झाली. या शोमध्ये झैन खान दुर्रानी आणि आदिल हुसैन यांच्याही भूमिका आहेत. याआधी त्यांनी मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्व्हने १ मध्ये छोटी भूमिका साकारली होती.