‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता एल्विश यादव सध्या रेव्ह पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आहे. त्याच्यावर रेव्ह पार्ट्यांमध्ये विषारी साप आणि परदेशी मुलींचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. हे आरोप झाल्यावर एक व्हिडीओ शेअर करून एल्विशने त्याची बाजू मांडली. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं त्याचं म्हणणं आहे. दरम्यान, अभिनेते प्रकाश राज यांनी एल्विश यादवचे भाजपा नेत्यांबरोबरचे काही फोटो शेअर करत टीका केली आहे.

‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल, रेव्ह पार्टीत सापाचे विष आणि परदेशी मुली पुरवल्याचा आरोप

प्रकाश राज यांनी एका युजरचे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये एल्विश यादव हा स्मृती इराणी, मोहन लाल खट्टर, निर्मला सीतारामन यांच्याबरोबर दिसत आहे. फोटो शेअर करणाऱ्याने “बाकी काही नाही, फक्त भाजपाचे काही नेते विष पुरवठा करणाऱ्याबरोबर” असं कॅप्शन दिलं होतं. ही पोस्ट शेअर करत प्रकाश राज यांनी लिहिलं की, “ते इतकी गरळ (विष) का ओकतात, याबद्दल आश्चर्य वाटायला नको.” तसेच त्यांनी जस्ट आस्किंग असा हॅशटॅग या पोस्टमध्ये टाकला होता.

दरम्यान, काही युजर्सनी प्रकाश राज यांच्या ट्विटरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी एल्विश यादवला इतक्या कमी वेळेत मिळालेलं यश झेपत नसल्याचं म्हटलं. तर काहींनी मात्र प्रकाश राज यांनी भाजपा नेत्यांचे फोटो ट्वीट केल्याने नाराजीही व्यक्त केली.

रेव्ह पार्ट्या, सापाचे विष अन् परदेशी तरुणी…, सर्व आरोपांवर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

नेमकं प्रकरण काय?

नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप पकडणाऱ्या ५ गारुडींना शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून ५ कोब्रा आणि काही विष जप्त करण्यात आले आहे. त्यांनी सांगितलं की ते एल्विश यादवला सापाचे विष पुरवायचे. याप्रकरणी एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader