अभिनेते प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. प्रशांत दामले यांनी त्यांच्या विनोदीबुद्धीने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच ते खवय्यांसाठीचे असलेले खास कार्यक्रम नेहमीच रंगवताना दिसतात. प्रशांत दामले हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतंच प्रशांत दामले यांनी त्यांची व्यथा मांडणारी एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
प्रशांत दामले हे अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच प्रशांत दामले यांनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांना करोना आणि निर्बंधाबाबत भाष्य केले आहे.
“माझी व्यथा…., नाटक संपल्यानंतर तुमच्या बरोबर फोटो काढणं, तुमच्या बरोबर गप्पा मारण, तुमच्या सूचना ऐकणं हे सगळंच मी मिस करतोय. पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. हा कोरोना आणि ही बंधन कधी संपत्यात अस झालय.. सगळं पूर्ववत होऊदे बाबा लवकर”, अशी पोस्ट प्रशांत दामले यांनी शेअर केली आहे. प्रशांत दामले यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. ती पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
प्रियंका चोप्राने ‘या’ अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन करण्यास दिला होता स्पष्ट नकार, म्हणाली…
दरम्यान त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. आम्ही सुद्धा आज नाटकाला आलो मात्र तुम्ही केलेल्या आवाहनानंतर तुम्हाला भेटायचे टाळले. आम्ही पण मिस करतो आहे तुम्हाला भेटणे, अशी पोस्ट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एका व्यक्तीने प्रशांत दामले यांच्या नाटकाचे कौतुक केले आहे. प्रशांत दादा तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद. दोन वर्षानंतर नाटक बघितलं आणि दोन वर्षांची कसर भरून निघाली. असच काम करत रहा स्वस्थ रहा मस्त रहा. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा, अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे.