अभिनेता प्रतीक बब्बर हा त्याच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. २३ जानेवारी २०१९ रोजी प्रतीक सान्या सागरसोबत विवाह बंधनात अडकला. त्यापूर्वी अनेक दिवस ते एकेमेकांना डेट करत होते. परंतु लग्नाच्या एक वर्षानंतरच त्यांच्यात वाद होऊ लागल्याचं समोर आलं होतं. लॉकडाऊनदरम्यान या दोघांनी घटस्फोट घेत आपला मार्ग वेगळा करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा प्रतीक प्रेमात पडला असल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा : ‘कुणास ठाऊक हल्ली कोणाच्या भावना केव्हा दुखावल्या जातील!’ अभिनेत्री गौहर खानचे ‘ते’ ट्विट चर्चेत

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो

सान्याशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना प्रतीक सध्या त्याच्या आयुष्यात खुश असल्याचे दिसत आहे. तसंच तो ‘बार बार देखो’ फेम अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत आहे. प्रतीक बब्बर आणि प्रिया यांच्यात जवळीकता वाढत असल्याच्या बातम्या आहेत.

प्रतीक बब्बरच्या जवळच्या सूत्रानं एका वृत्तवाहिनीला सांगितलं की, “प्रिया आणि प्रतीक एकमेकांना जवळपास एक वर्षापासून ओळखतात. छोट्या पडद्यावरील एका कॉमन मित्राच्या मदतीनं ते एकमेकांना भेटले. प्रतीकनं प्रिया बॅनर्जीविषयी आपल्या कुटुंबाला कल्पना दिली आहे. ते दोघे नेहमी बाहेर एकत्र फिरायला जातात, एकत्र काम करतात पण तरीही अद्याप त्यांना आपलं हे नातं सगळ्यांसमोर जाहीर करायचं नाही. ते जेवढं प्रकाशझोतापासून दूर राहिल तेवढं चांगलं असं प्रतीकचं सध्या म्हणणं असे. याचं कारण म्हणजे प्रतीकचा सान्याशी होत असलेला घटस्फोट हे आहे.”

हेही वाचा : मलायका अरोरा – अरबाज खान पुन्हा येणार एकत्र ? फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, प्रतीकने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रिया बॅनर्जीबद्दल सांगायचे तर, तिने संजय गुप्ता यांच्या ‘जज्बा’ चित्रपटातून ‘सिया’ची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर सध्या प्रतीक बब्बर ‘वो लड़की है कहां’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत आहेत.

Story img Loader