मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘टकाटक’. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामधील बोल्ड सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘टकाटक’ मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘टकाटक २’चा (Takatak 2 Teaser) टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
आणखी वाचा – VIDEO : झोप अनावर झाली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील वनिता खरातचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
‘टकाटक’च्या यशानंतर ‘टकाटक २’मध्ये नवीन काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. आता चित्रपटाच्या धमाकेदार टीझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. या टीझरमध्ये बिकीनी लूकमधील अभिनेत्री पाहायला मिळत आहे. तसेच अभिनेता प्रथमेश परबचे (Prathmesh Parab) टीझरमझधील संवादही लक्षवेधी आहेत. ‘टकाटक २’च्या टीझर पाहता मराठीमधील हा सगळ्यात बोल्ड टीझर असल्याचं दिसून येतं.
पाहा व्हिडीओ
‘टकाटक’मधील काही बोल्ड सीन्सची सिनेवतृळामध्ये बरीच चर्चा रंगली. ‘टकाटक २’बोल्डनेसचा तडका तसेच धमाल मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवता येईल. प्रथमेशबरोबरच क्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
आणखी वाचा – Photos : वयाच्या ५०व्या वर्षी राहुल खन्नाचं न्यूड फोटोशूट, अभिनेत्याला पाहून मलायका अरोरा म्हणते…
‘टकाटक’प्रमाणेच ‘टकाटक २’देखील मनोरंजनाच्या माध्यमातून एक सुंदर संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण गोव्यात झालं आहे. म्हणजेच गोव्याचं निसर्ग सौंदर्य आणि धमाल-मस्ती यामध्ये पाहायला मिळेल. मिलिंद कवडे यांनी ‘टकाटक २’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. १८ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.