मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रताप ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत पृथ्वीक प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. त्याने अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पृथ्वीकने चित्रपटसृष्टीतील संघर्ष आणि केवळ सोशल मीडियावर फॉलोवर्स नाही म्हणून त्याला रिजेक्ट करण्यात आले याबाबत खुलासा केला आहे.
सोशल मीडियावर पुरेसे फॉलोवर्स नाहीत म्हणून रिजेक्ट करण्यात आले याविषयी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीक म्हणाला, “मला अनेकदा ऑडिशन दिल्यावर नकार कळवण्यात आला आणि याबाबत माझे काहीच म्हणणे नाही. पण, एकदा मला सोशल मीडिया फॉलोवर्स नाहीत म्हणून रिजेक्ट करण्यात आले होते. त्या लोकांनी माझ्या कलेचा विचार न करता तुमच्याकडे १ लाख फॉलोवर्स नाहीत, त्यामुळे नाही होऊ शकत असे कळवले. तेव्हा सोशल मीडियावर माझे फक्त १६ ते १७ हजार फॉलोवर्स होते.”
हेही वाचा : बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का? बालपणी व्हायचं होतं वैमानिक, पण…
पृथ्वीक प्रताप पुढे म्हणाला, “अशा गोष्टींचा राग येण्यापेक्षा मला वाईट जास्त वाटतं कारण, यामुळे कलाकाराचे काम न पाहता केवळ सोशल मीडियावर तो काय करतो याचा विचार केला जातो आणि हेच लोक पुढे ट्रोल संस्कृती वाढवायला मदत करतात.”
हेही वाचा : बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का? बालपणी व्हायचं होतं वैमानिक, पण…
आयुष्यातील चांगल्या माणसांविषयी सांगताना अभिनेता म्हणाला, “माझ्या आयुष्यात सुप्रिया पाठारे, विनोद गायकर, श्रुती मराठे, समीर चौघुले, सचिन मोटे, सचिन गोस्वामी, प्रसाद खांडेकर, माझा मोठा भाऊ प्रतीक कांबळे ही माझी माणसं मला वेळोवेळी कान पकडून सांगतात तू अजून मोठा झाला नाहीस, नेहमी प्रामाणिक राहा. आयुष्यात हे सगळे लोक मला नेहमीच प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देतात.”