अभिनेता माधवन आणि विजय सेतुपती यांचा दाक्षिणात्य चित्रपट ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकची चर्चा गेले बरेच दिवस होत आहे. हिंदी चित्रपटात आपल्याला अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टी सिरिजच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर हा टीझर प्रदर्शित झाला आहे, हृतिक आणि सैफ या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
या मूळ चित्रपटात आर. माधवन मुख्य भूमिकेत दिसला होता. नाम्बी नारायण चित्रपटाच्या यशामुळे सध्या त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने अनेक मुलाखती दिल्या आहेत. बॉलिवूड हंगामा यांना दिलेल्या मुलाखतीत त्याने नाम्बीर नारायण चित्रपटाच्या बरोबरीने विक्रम वेधाच्या रिमेकबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
जेव्हा त्याला प्रश्न विचारला की, विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकबद्दल तुझं मत काय? यावर आर माधवन म्हणाला की, ‘यावर मी कोणतेही ठराविक साच्यातले उत्तर देणार नाही पण हृतिक रोशन यात छान दिसत आहे. मी उत्सुक आहे सैफ अलीखान भूमिका पाहण्यासाठी कारण मूळ चित्रपटात मी ती भूमिका साकारली होती’.
अॅक्शन अन् अभिनयाचा तडका, हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’चा टीझर प्रदर्शित
मूळ चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला मोठया प्रमाणावर यश मिळाले होते. आता हिंदी रिमेकमध्ये पहिल्यांदाच सैफ अलीखान आणि हृतिक रोशन दिसणार आहेत. दोघेही पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसल्याने त्यांचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. या दोघांबरोबर अभिनेत्री राधिका आपटेची झलकसुद्धा यात आपल्याला बघायला मिळेल.
३० सप्टेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान ‘विक्रम वेधा’चा ट्रेलरही बघायल मिळू शकतो असं म्हंटलं जात आहे. हृतिक रोशनने आमिरच्या चित्रपटाचं कौतुक केलं त्यामुळे हा चित्रपटही बॉयकॉट करा हा ट्रेंड चांगलाच व्हायरल झाला होता. पण हा टीझर पाहून सोशल मीडियावर प्रेक्षक याची प्रशंसा करताना दिसत आहेत.