अभिनेता आर. माधवन याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने गेल्या काही वर्षात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही खूप नाव कमावले आहे. आर. माधवनच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ या चित्रपटाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.ओटीटीवरही हा चित्रपट ट्रेंडींगवर असल्याचे पाहायला मिळत आहे. आर माधवन प्रमाणे त्याचा मुलगा देखील चर्चेत असतो
आर माधवनच्या मुलाचे कौतुक देखील त्याचे चाहते करत असतात. नुकताच वेदांतने ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक्समध्ये कनिष्ठ गटात १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. आपल्या मुलाचे कौतुक आर माधवन नेहमीच करत असतो. आज मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तो असं म्हणतोय ‘१७ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मुला, एक मोठे वर्ष आपल्या दोघांची वाट बघत आहे. मी प्रार्थना करतो यावर्षी तुला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळो’. अशा शब्दात आर माधवनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
“आर माधवनचा मुलगा म्हणून नाही तर…” सुवर्ण पदक जिंकल्यावर वेदांतचं मोठं वक्तव्य
आर माधवनच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील वेदांतला शुभेच्छा दिल्या आहेत. अनुपम खेर यांच्या मुलाने, सिकंदर खेरने देखील शुभेच्छा दिल्या आहेत तो असं म्हणतो की ‘वेदांतने या आधीच देशाचे नाव मोठे केले आहे, तुला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो’ शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दर्शन कुमार अभिनेत्याने देखील वेदांतला शुभेच्छा दिल्या आहेत. आर माधवनच्या चाहत्यांनी देखील वेदांतला शुभेच्छा तर दिल्या आहेत त्याचबरोबरीने रॉकेट्री चित्रपटासाठी आर माधवनचे अभिनंदन केले आहे.
आर माधवनचा मुलगा वेदांत हा एक व्यावसायिक जलतरणपटू आहे. त्याने एप्रिल महिन्यात कोपनहेगनमधील ‘डॅनिश ओपन २०२२’ या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. काही महिन्यांपूर्वीच वेदांतच्या ऑलिंपिक प्रशिक्षणासाठी माधवनचे कुटुंब दुबईला स्थायिक झाले होते.