Rajendra Prasad daughter Gayatri died of Heart Attack : तेलुगू सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिग्गज तेलुगू अभिनेते राजेंद्र प्रसाद यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याची मुलगी गायत्रीचं निधन झालं आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने गायत्रीने अवघ्या ३८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री राजेंद्र प्रसाद यांच्या मुलीला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तिला तात्काळ हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे उपचारादरम्यान गायत्रीचे निधन झाले. राजेंद्र प्रसाद यांना गायत्री ही मुलगी व एक मुलगा आहे. गायत्री विवाहित होती, तिला एक मुलगी आहे. गायत्रीची मुलगी साई तेजस्विनी ही बालकलाकार आहे.

हेही वाचा – “सायकलवरून आलेल्या एका माणसाने मला…”, अभिनेत्रीने सांगितला भयंकर अनुभव; म्हणाली, “मला ओरडायचं होतं, पण…”

गायत्रीच्या निधनाची बातमी कळताच तेलुगू सिनेसृष्टीतील अनेकांनी राजेंद्र प्रसाद यांच्या घरी पोहोचले आणि शोक व्यक्त केला. तसेच गायत्रीला श्रद्धांजली वाहिली. अभिनेता ज्युनिअर एनटीआरने एक्सवर पोस्ट करून दुःख व्यक्त केले आहे.

ज्युनिअर एनटीआरने एक्स पोस्ट करन गायत्रीला श्रद्धांजली वाहिली.

गायत्रीने वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यामुळे राजेंद्र प्रसाद तिच्याशी काही काळ बोलत नव्हते. पण नंतर मात्र त्यांच्यातील नाराजी संपली आणि ते लेकीबरोबर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये दिसायचे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor rajendra prasad daughter gayatri died of heart attack at 38 hrc