दाक्षिणात्य सुपरस्टार आणि आरआरआर फेम राम चरण काही दिवसांपूर्वीच बाबा झाला. राम चरणची पत्नी उपासना कमिनेनी २० जूनला एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे सध्या त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर आज त्यांच्या लेकीचं बारसं संपन्न झालं. त्यांच्या मुलीच्या नावाने आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
मुलीला जन्म दिल्यानंतर चार दिवसांनी रामचरण च्या पत्नीला डिस्चार्ज देण्यात आला. त्यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वायरल होत होता. लेकीला घरी आणल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरी बारशाची जय्यत तयारी सुरू होती. त्याबद्दलचे अपडेट्स उपासना सोशल मीडिया वरून शेअर करत होती. तेव्हापासून चाहत्यांमध्ये ते दोघं त्यांच्या मुलीचं नाव काय ठेवणार याची उत्सुकता होती.
आणखी वाचा : नीता व मुकेश अंबानींनी राम चरणच्या लेकीला भेट म्हणून दिला सोन्याचा पाळणा, किंमत तब्बल…
आज राम चरणच्या लेकीचं बारसं झालं. राम चरण आणि उपासनाने या बारशाचे काही फोटो सोशल मीडिया वरून शेअर केले. हे बारसं अत्यंत पारंपारिक पद्धतीने पार पडलं. यावेळी राम चरणने ऑफ वाईट रंगाचा झब्बा कुर्ता आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा सोनेरी काठ असलेलं उपरणं घेतलं होतं. तर उपासनानेही ऑफ वाईट रंगाची साडी नेसली होती. याचबरोबर घरातील इतर मंडळींनी ऑफ वाईट रंगाचे कपडे परिधान केले होते. अत्यंत थाटामाटात हे बारसं पार पडलं. त्यांनी त्यांच्या लेकीचं नाव ‘क्लिन कारा कोनिडेला’ असं ठेवलं आहे.
हेही वाचा : “अभिनेता राम चरणला ऑस्कर द्या…”; चाहत्यांच्या मागणीने धरला जोर
या नावाबद्दलची एक पोस्ट शेअर करत राम चरण आणि उपासनाने लेकीचं नाव तर जाहीर केलंच पण त्याचबरोबर या नावाचा अर्थही सांगितला. या नावाचा अर्थ खूप खास आहे. या नावाचा अर्थ आध्यात्मिक जागृती करणाऱ्या उर्जेचं प्रतिक..असा होतो. तर आता नेटकरी त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत हे नाव आवडल्याचं सांगत लेकीला, राम चरण आणि त्याच्या कुटुंबीयांना शुभेच्छा देत आहेत.