तेलुगू सुपरस्टार प्रभास हा चांगलाच चर्चेत असतो. ‘बाहूबली’च्या यशानंतर तो जणू तरुणांच्या गळ्यातील ताईतच बनला आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाकडे लोक खूप आतुरतेने पाहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘आदिपुरुष’ चित्रपटातील टीजरमुळे तो पुन्हा चर्चेत आला. चित्रपटाला प्रेक्षकांनी विरोध दर्शवला असला तरी त्यांना प्रभासचा लूक आवडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात प्रभासबरोबर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री क्रीती सनॉन दिसणार आहे. यामुळेच प्रभास गेले काही दिवस चर्चेत आहे. मात्र या प्रकरणावर मोठी बातमी समोर आली आहे. प्रभास नुकताच नंदमुरी बाळकृष्ण यांच्या कार्यक्रमात उपस्थित होता. या मुलाखतीच्या कार्यक्रमात एक खेळ होता ज्यात नंदमुरी यांनी अभिनेता रामचरणला फोन करून प्रभासच्या लव्ह लाईफबद्दल विचारले, त्यांच्या संभाषणादरम्यान राम चरण यांनी स्पष्ट सांगितले की ‘प्रभास सिंगल आहे तो कोणत्याही मुलीला डेट करत नाहीये,’ असे सांगितले.

Photos : मिका सिंगचं नव्हे तर बॉलिवूडचे ‘हे’ गायकदेखील एका गाण्यासाठी घेतात इतके मानधन; आकडे ऐकून व्हाल थक्क

याआधी नंदमुरी बाळकृष्ण यांच्या कार्यक्रमात प्रभासने हजेरी लावली होती. प्रभास लग्न कधी करणार हा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर प्रभासने हसत उत्तर दिलं की, “आधी सलमान खानला लग्न करू द्या, मग मी करेन.” प्रभासच्या या उत्तरावर सगळे मनमुराद हसले.

दरम्यान प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा ‘आदिपुरुष’ हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यात या दोघांव्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा ओम राऊत याने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १६ जून २०१३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor ram charan open up about prabhas love life video viral spg