दाक्षिणात्य सुपरस्टार आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. सध्या दोघंही अमेरिकेत आहेत आणि उपासना लवकरच आई होणार आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून उपासना अमेरिकेतच बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. पण आता या सगळ्या चर्चांवर राम चरणची पत्नी उपासनाने मौन सोडलं आहे. तिने बाळाला अमेरिकेत जन्म देण्याच्या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम चरण आणि त्याची पत्नी उपासनाने डिसेंबर २०२२ मध्ये प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. उपासना ही एक मोठी बिझनेस वूमन आहे. याशिवाय ती जी अपोलो रुग्णालयाच्या सीएसआरची वॉइस चेअरपर्सन आहे. अशात उपासनाने अमेरिकेत बाळाला जन्म देण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम लावत, त्यांचं बाळ भारतातच जन्माला येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा- “हे कोणत्याही लता-फताचं गाणं नाही”, म्हणत रानू मंडलने केला लता मंगेशकर यांचा अपमान

लोकप्रिय शो ‘गुड मॉर्निंग अमेरिका’मध्ये राम चरणने अलिकडेच हजेरी लावली होती. त्यानंतर ही जोडी अमेरिकेतच बाळाला जन्म देईल असं बोललं जाऊ लागलं होतं. मात्र आता उपासनाने ट्वीटरवरून तिची डिलिव्हरी भारतातच होणार असल्याचं सांगितलं आहे.

उपासना म्हणते, “मी माझ्या देशात, भारतात माझ्या पहिल्या बाळाला जन्म देण्यासाठी खूपच उत्सुक आहे. अपोलो हॉस्पिटलमध्ये जागतिक स्तरावरील मेडिकल ओबी/ जीवायईएन टीम कार्यरत आहे. ज्यात डॉ सुमना मनोहर, डॉ रुमा सिन्हाके यांच्याबरोबरच गुड मॉर्निंग अमेरिका शोच्या डॉ जेनिफर एश्टनही आहेत. हा प्रवास आमच्यासाठी एक चांगला अनुभव घेऊन आला आहे. आम्ही आमच्या जीवनात या नव्या सुरुवातीची खूप आतुरतेने वाट पाहत होतो.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor ram charan wife upasana talk on rumours about she will give birth a baby in america mrj