बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग हा नेहमीच त्याच्या उत्साहामुळे ओळखला जातो. अभियनसह, सूत्रसंचालन आणि इतर मनोरंजनपर कार्यक्रमातील त्याचे सादरीकर उत्साहाने ओतप्रोत असतो. दरम्यान, रणवीर सिंग सध्या एफ-१ कार रेसिंग स्पर्धा पाहण्यासाठी थेट अबुधाबीमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे अबुधाबीमध्येही त्याने पुन्हा एकदा आपल्या उत्साहाचे दर्शन घडवले आहे. रणवीरने जगप्रसिद्ध गायक एकॉनसोबत ( Akon) गाणं गायलं आहे.
हेही वाचा >>> ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात मराठी अभिनेत्याची वर्णी; कमेंट करत विकी कौशल म्हणाला, “मित्रा…”
रणवीर सिंगने एकॉनला शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या रा-वन या चित्रटातील ‘छम्मकछल्लो’ हे हिंदी गाणं गायला लावलं आहे. एकॉन गात असताना रणवीर सिंगदेखील हेच गाणे गुणगुणताना दिसतोय. विशेष म्हणजे गाणे गाताना दोघेही आनंदात नाचत आहेत. रणवीर सिंगचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा >>> कॉन्सर्टनंतर प्रसिद्ध गायिकेबरोबर घडला धक्कादायक प्रकार; पोस्ट शेअर करत म्हणाली…
दरम्यान, रणवीर सिंग सध्या अनेक चत्रपटांवर काम करत आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असेल. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, जॉनी लिव्हर हे दिग्गज कलाकार असतील. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटातही रणवीर सिंग दिसेल. रणवीरसोबत आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल.