अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ हा चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर काही वर्षांनी या चित्रपटाचा रिमेक करण्यात आला. या चित्रपटाचं नाव होतं ‘डॉन २.’ या चित्रपटात शाहरुख खानने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’प्रमाणेच शाहरुख खानचा ‘डॉन २’ ही प्रचंड गाजला. त्यानंतर आता पुन्हा एकदा या चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याची बातमी आली आहे. या चित्रपटात सध्याचा आघाडीचा एक अभिनेता छोटीशी भूमिका साकारणार आहे.

आणखी वाचा : बिग बी झाले आणखी एका आलिशान घराचे मालक, मुंबईत ‘या’ ठिकाणी खरेदी केली नवी मालमत्ता

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”

फरहान अख्तर ‘डॉन ३’ बनवणार आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्याप्रमाणेच या चित्रपटासाठी त्याने तयारीही सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी शाहरूखला ‘डॉन ३’ ऑफर केला गेला होता. पण सध्या तरी त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. शाहरूखला ‘डॉन ३’ची स्क्रिप्ट आवडली नाही, असं नाही. पण शाहरूखला या चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल खात्री वाटत नव्हती. डॉन एक प्रसिद्ध भूमिका आहे आणि शाहरूखला ती करायची आहे. पण स्क्रिप्टबद्दल पूर्णपणे खात्री होईपर्यंत शाहरूखला काहीही निर्णय घ्यायचा नाही.

हेही वाचा : फक्त ‘ब्रह्मास्त्र’च नव्हे तर ‘या’ चित्रपटांमध्येही केला होता शाहरुख खानने कॅमिओ

शाहरुखने या चित्रपटाला सध्या नकार दिला असला तरी भविष्यात तो या चित्रपटाला होकारही देऊ शकतो. तर शाहरुख खान बरोबर अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात एक भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच अमिताभ बच्चनही या चित्रपटात काम करणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटात शाहरुख आपले डॉनचे टायटल रणवीर सिंगकडे सोपवणार आहे, जेणेकरून डॉनचे पुढील भाग रणवीर सिंगवर बनवता येतील. परंतु याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Story img Loader