बॉलिवूडमधील प्रेक्षकांचं लाडकं कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांची लव्हस्टोरी आणि भन्नाट केमिस्ट्री तर साऱ्यांनाच माहित आहे. बऱ्याच वेळा त्यांच्यातील हे प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना पाहायलाही मिळतं. सध्या देशात लॉकडाउन असल्यामुळे सारेच जण घरात अडकले आहेत. त्यामुळे रितेश-जेनेलियादेखील घरीच असून सध्या ते त्यांच्या क्वालिटी टाइम व्यतीत करत आहेत. मात्र या काळात ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्याही संपर्कात आहेत. विशेष म्हणजे हे दोघं टिकटॉकवर जास्त सक्रीय असून सध्या त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर क्वारंटाइनमध्ये त्यांच्या प्रेमाला बहर आल्याचं दिसून येत आहे.
सध्याच्या तरुणाईमध्ये टिकटॉकचं प्रचंड वेड असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे अनेक कलाकारांनाही या टिकटॉकची भूरळ पडली आहे. मराठी कलाविश्वापासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत अनेक जण टिकटॉकवर सक्रीय आहेत. यामध्ये रितेश आणि जेनेलिया सर्वाधिक अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. बऱ्याच वेळा ते वेगवेगळे व्हिडीओ यावर शेअर करत असतात. यात रितेशने एक व्हिडीओ शेअर करुन जेनेलियाप्रतीचं त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.
View this post on Instagram
Love in Lockdown @geneliad ….. favourite song from Saajan…. @madhuridixitnene @duttsanjay
रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत जेनेलिया दिसत असून ती पुस्तक वाचण्यात मग्न आहे . तर रितेश ‘मेरा दिल भी कितना पागल है’ या गाण्यावर अभिनय करत आहे. हे गाणं ‘साजन’ चित्रपटातील असून अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. १९१९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातलं हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. त्यामुळे रितेशलादेखील या गाण्यातून त्याचं प्रेम व्यक्त करण्याचा मोह आवरला नाही. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर क्वारंटाइनमध्ये रितेश-जेनेलियाच्या प्रेमाला बहर आल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, रितेश आणि जेनेलिया टिकटॉकवर चांगलेच अॅक्टीव्ह असतात. त्यातच त्यांची लोकप्रियता अफाट असल्यामुळे येथे त्यांचे फॅन फॉलोव्हर्सदेखील प्रचंड आहेत.अलिकडेच रितेशने भांडी घासतानाचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला होता. लॉकडाउनच्या काळात त्याला घरात राहून काय-काय काम करावी लागतायेत हे त्यांने मजेशीर अंदाजात सांगितलं होतं. हा व्हिडीओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता.