‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घराघरांत आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला जर मी हॉटसीटवर असतो/असते तर एवढी रक्कम नक्कीच जिंकली असती, असे वाटते. लवकरच सोनी मराठीवर प्रेक्षकांना ही संधी उपलब्ध होणार आहे. येत्या ६ जूनपासून सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी मिळणार आहे.
कोण होणार करोडपती या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. ‘आता आलीये आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ’, असं या कार्यक्रमाच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत.
“आमचे नाते पक्के होणार होतं पण तेव्हाच…”, रितेश देशमुखने उघड केले गुपित
सचिन खेडेकर हे हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीनी बोलून त्यांना मानसिक आधार देण्याचं महत्त्वाचं काम लीलया पार पाडतात. सचिन खेडेकर हे मनोरंजन क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे. ते ज्ञानार्जन आणि मनोरंजन या दोन्हींची उत्तम सांगड घालतात. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक सहभागी होत असतात.
प्रत्येक स्पर्धकाचा जीवनसंघर्ष जाणून घेऊन, त्याला कार्यक्रमाची माहिती देऊन त्यांना बोलतं करण्याचे काम सचिन खेडेकर करताना दिसतात. सचिन खेडेकर हे सध्या सूत्रसंचालकाची धुरा उत्तमरीत्या सांभाळताना दिसत आहे. येत्या ६ मे पासून सुरु होणाऱ्या कोण होणार करोडपती या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
‘अजान’ नंतर सोनू निगमचं आणखी एक वादग्रस्त विधान, म्हणाला “नवरात्रीत मटण बंदी….”
या कार्यक्रमात कसे सहभागी व्हायचे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र यासाठी आधीच्या दोन्ही पद्धतीप्रमाणे नोंदणी करावी लागणार आहे. लवकरच सोनी वाहिनीकडून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया सांगितली जाणार आहे.