शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर धर्मवीर हा सिनेमा आला होता. या सिनेमाची खूप चर्चा राज्यभरात झाली. धर्मवीर अशी उपाधी ज्यांना देण्यात आली होती. त्याच नावाने हा सिनेमाही आला होता जो गाजला. आता या सिनेमाचा पुढचा भाग येतो आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी या भागाचंही दिग्दर्शन केलं आहे. तर मंगेश देसाईंनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज या सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबतच्या एका वक्तव्याने सस्पेन्स वाढवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धर्मवीर २ चं पोस्टर लाँच

धर्मवीर २ या सिनेमाचं पोस्टर लाँच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला अभिनेते प्रसाद ओक, सचिन पिळगावकर, अशोक सराफ यांची उपस्थिती होती. तर हिंदी चित्रपटसृष्टीतला अभिनेता बॉबी देओलही या कार्यक्रमाला उपस्थित होता. सचिन पिळगावकर यांनी एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

हे पण वाचा- आरारा खतरनाक! दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवीण तरडेंची ‘खलनायक’ म्हणून एन्ट्री; म्हणाले, “अख्ख्या भारतभर मार्केट…”

मंगेश देसाई काय म्हणाला?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यंत्रिपदाची शपथ घेऊन दोन वर्षे पूर्ण झाली. माझी इच्छा आहे की ते दहा वर्षे मुख्यमंत्री रहावेत. मी बाप्पाच्या चरणी तशी प्रार्थना करतो. धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा ९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अशीही माहिती मंगेश देसाईंनी दिली.

हे पण वाचा- “ग्रेट टीम इंडिया”; विश्वचषकातील विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भारतीय संघाचं अभिनंदन; म्हणाले…

सचिन पिळगावकरांनी वाढवला सस्पेन्स

“साहेब, तुम्ही आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन दोन वर्ष झाली आहेत. मी मंगेशला विचारतोय, मुख्यमंत्री म्हणून दहाच वर्ष का? पुढे का नाही? मुख्यमंत्री साहेब तुम्ही या चित्रपटात काम केलंय, असं कळलं. तुमचं सिनेसृष्टीत स्वागत”, असं सचिन पिळगावकर म्हणाले. सचिन पिळगावकर यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटात खरंच काम केलंय का? त्यांनी खरंच काम केलं असेल तर ते सिनेमात मोठ्या पडद्यावर दिसतील का? असे प्रश्नांचा सस्पेन्स वाढवला आहे.

महेश कोठारे आणि अशोक सराफ काय म्हणाले?

“पहिला सिनेमा ही एक कमाल कलाकृती होती . आम्हाला वाटलं की अभिनेता क्षितीज हाच शिंदे साहेब आहे, असं वाटत होतं. २ वर्ष झाली, खरं तर तुमचं काम हे १० वर्षाचं काम केलं आहे. तुम्ही २० वर्ष मुख्यमंत्री राहा आणि महाराष्ट्र सुपरहीट काम करा. येताना मी कोस्टल रोडने आलो किती भारी काम केलं आहे”, असं महेश कोठारे म्हणाले. “धर्मवीर सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं शूटिंगही झाले आहे. पहिल्या धर्मवीरने एक वेगळी पसंती प्रेक्षकांनी दिली होती. आता धर्मवीर २ ची उत्सुकता आहे. हा सिनेमाही पहिल्या सिनेमा सारखाच चांगला होईल”, असं अशोक सराफ म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मी आज सगळ्यांनाच शुभेच्छा देतो आहे. आम्ही आनंद दिघेंचा संघर्ष पाहिला आहे. त्यांचं बँकेत खातंही नव्हतं. तरीही त्यांनी राजकारण केलं, समाजकारण केलं. मी त्यांच्या सावलीत माझी वाटचाल सुरु केली. माझ्यासाठी पंचाक्षरी मंत्राप्रमाणेच आनंद दिघे हे नाव होतं. कुणाचंही काम असूद्या आनंद दिघे ते करत असत. आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून जबाबदारी पार पाडत असू. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाही शब्द आम्ही कधीही खाली पडू दिला नाही. असं म्हणत एकनाथ शिंदेंनी पोस्टर लाँचच्या वेळी प्रतिक्रिया दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sachin pilgaonkar welcomed cm eknath shinde in film industry during dharmaveer 2 movie poster launch program what did he sayrno news scj