अभिनेता सैफ अली खान आणि बॉलीवूड स्टार श्रीदेवी आपापल्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असताना त्यांची मुले देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज असल्याचे दिसते. सैफ अली खानच्या मुलगा इब्राहिमयाचा श्रीदेवी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलींसोबतचा एफ फोटो समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. खुद्द इब्राहिम याने हा फोटो शेअर केला आहे. श्रीदेवीची मुलगी खुशी आणि अनुराग कश्यपची मुलगी आलिया यांच्यासोबत काढलेला हा फोटो नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या तिघांना एकत्र पाहून ते लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही इब्राहिमने लंडनमध्ये करीना कपूरसोबत काढलेला फोटो व्हायरल झाला होता.
श्रीदेवी आणि अनुराग कश्यपच्या मुलींसोबतचा सैफच्या मुलाचा फोटो व्हायरल
अभिनेता सैफ अली खान आणि बॉलीवूड स्टार श्रीदेवी आपापल्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असताना त्यांची मुले देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज असल्याचे दिसते.

First published on: 12-08-2015 at 04:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor saif ali khans son ibrahim hangs out with sri devi and anurag kashyaps daughters