अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या भारत या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याने पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याने त्याच्याविरोधात स्थानिकांकडून तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता सलमान एका आगळ्यावेगळ्या अंदाजात आपल्यासमोर आला आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासोबत तो सायकलिंग करताना दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने त्याचा हा सायकलिंग करतानाची व्हिडियो ट्विट केला आहे. या व्हिडियोला सलमानच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेचुका या अरुणाचल प्रदेशमधील डोंगराळ भागात हे सगळे एकत्रित सायकलिंग करतानाचा हा व्हिडियो आहे. यामध्ये सलमानने मरुन रंगाचे जॅकेट घातले असून तो अतिशय मनसोक्तपणे सायकलिंग करत असल्याचे दिसत आहे. सायकलिंग करत असलेले रस्ते म्हणजे पायवाटा असून हा अरुणाचल प्रदेशचा दुर्गम भाग असल्याचे दिसत आहे. या तिघांसोबत आणखीही २ जण सायकलिंग करत असल्याचे दिसत आहे. यावेळी त्याच्या सायकलचा वेग वाढत असल्याने मागून कोणीतरी त्याला वेग कमी कर असे सांगत असल्याचे व्हिडियोमध्ये ऐकू येत आहे.